spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Viral video भररस्त्यात हार्ट अटॅक आलेल्या वृद्ध व्यक्तीला, महिला पोलिसाने सीपीआरनं दिले जीवनदान

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये हृदयविकाराचा (Heart attack) झटका आलेल्या वृद्धाचे प्राण एका महिला पोलिसाने वाचवले. उपनिरीक्षक सोनम पराशर यांनी रस्त्यावरील माणसाला वेळेवर सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) (Cardiopulmonary resuscitation) दिला. त्यानंतर पराशर यांनी त्यांना पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात नेले. पराशर हे हेल्मेट तपासणी ड्युटीवर होते. त्याला रस्त्यात एक माणूस पडलेला दिसला. ती लगेच त्याच्या मदतीला धावली आणि तिच्या सहकाऱ्याला रुग्णवाहिका बोलवायला सांगितली. दरम्यान, त्याची गंभीर प्रकृती पाहून पराशर यांनी त्याला सीपीआर देण्यास सुरुवात केली. रिपोर्टनुसार, अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, सीपीआर वेळेवर दिला नसता तर रुग्णाचा जीव वाचवणे कठीण झाले असते.

ही संपूर्ण घटना सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील गोला मंदिर चौकात घडली. ६२ वर्षीय सेवानिवृत्त अकाऊण्टंट अनिल उपाध्याय नेहमीप्रमाणे पायी निघाले होते. अचानक हार्ट अटॅक आल्याने ते जागीच कोसळले. रुग्णालयात नेण्यास किंवा सीपीआर देण्यास आणखी काही काळ उशीर झाला असता, तर कदाचित अनर्थ घडू शकला असता. एसएसपी अमित सांघी यांनी महिला पोलिसाच्या कार्याचे कौतुक करत त्यांचा सन्मान करण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले तर गृहमंत्र्यांनी प्रोत्साहन दिले

जेव्हा सीएम शिवराज सिंह चौहान यांना सोनम पराशरच्या कौतुकास्पद कामाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सोनम पराशरच्या या कामाचे कौतुक केले. गृहराज्यमंत्री डॉ.नरोत्तम मिश्रा यांनी सोनम पाराशर यांना फोन करून प्रोत्साहन दिले. सोनम पराशर सांगतात की, तिने फक्त तिचं कर्तव्य बजावलं आहे. प्रशिक्षणात जे काही शिकलो त्यामुळे ती वृद्धाचे प्राण वाचवू शकली.

Latest Posts

Don't Miss