spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

युक्रेनच्या लष्करी गुप्तचर प्रमुखांचा धक्कादायक दावा, ‘या’ आजारामुळे होऊ शकतो व्लादिमीर पुतिन यांचा मृत्यू

व्लादिमीर पुतिन कर्करोगामुळे वेळोवेळी सार्वजनिक ठिकाणी दिसणे टाळत आहेत, असा दावा युक्रेनच्या गुप्तचर संस्थेच्या सर्वोच्च व्यक्तीने केला आहे.

युक्रेनच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख किरिलो बुडानोव्ह यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पुतिन यांना कर्करोगाच्या घातक आजाराने ग्रासले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. व्लादिमीर पुतिन कर्करोगामुळे वेळोवेळी सार्वजनिक ठिकाणी दिसणे टाळत आहेत, असा दावा युक्रेनच्या गुप्तचर संस्थेच्या सर्वोच्च व्यक्तीने केला आहे. मात्र, रशियन सरकारने अशा कोणत्याही दाव्यावर कधीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

गुप्तचर विभागाच्या प्रमुखांचा दावा

ब्रिटनच्या न्यूज वेबसाईट ‘मिरर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, युक्रेनचे संरक्षण गुप्तचर प्रमुख बुडानोव म्हणाले, ‘रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन दीर्घकाळापासून कर्करोगाशी झुंज देत आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या भावी आयुष्याची चिंता करणे गरजेचे आहे. सर्व काही सहज समजण्यासारखे आहे. क्रेमलिनच्या नेत्याच्या जवळच्या सूत्रांनी याची माहिती दिली कि ७० वर्षीय पुतिन कर्करोगाने ग्रस्त आहेत. एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बुडानोव म्हणाले की, पुतीन यांच्या प्रकृतीशी संबंधित अनेक बातम्या आणि युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ल्याची शक्यता याआधी रशियापासून लपवून ठेवण्यात आली आहे. बुडानोव यांच्या मते, रशियासोबत सुरू असलेले युद्ध थांबणार नाही, म्हणजेच या वर्षीही दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच राहतील, असे त्यांना वाटते.

पुतिन यांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस त्यांचे दोन मोठे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले होते. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याबद्दल अनेक तर्क लावले जात होते. या कार्यक्रमांमध्ये टँक उत्पादन कारखान्याला भेट देण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. पुतिन यांना कोणत्या ना कोणत्या गूढ आजाराने ग्रासले आहेत, असा दावा अनेकदा केला जातो. युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरू झाल्यापासून पुतीन गंभीर आजारी असल्याचे अनेक अहवाल येत आहेत.

गेल्या वर्षी ऑगस्ट २०२२ मध्ये, अमेरिकन मासिक न्यूजवीकमध्ये एक अहवाल सादर गेला होता, ज्यामध्ये असे लिहिले होते की अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेशी संबंधित अनेक लोकांचा असा विश्वास आहे की पुतिन गंभीर आजाराने ग्रस्त आहेत आणि कर्करोगावर उपचार घेत आहेत. या दाव्याच्या समर्थनार्थ, असे म्हटले जात होते की पुतीन एप्रिलमध्ये जागतिक दृश्यातून जवळजवळ पूर्णपणे गायब झाले होते कारण ते एडवांस स्टेज च्या कर्करोगावर उपचार घेत होते.

हे ही वाचा:

Air India Case शंकर मिश्रा कसा आला पोलिसांच्या ताब्यात, जाणून घ्या अटकेची संपूर्ण कहाणी

Happy Birthday Bipasha बिपाशाच्या सिनेसृष्टीतील आयुष्याबद्दल तुम्हाला माहित आहे का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss