spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

घर खरेदी करण्यासाठी LIC कडून गृहकर्ज घ्यायचे आहे, तर जाणून घ्या ही माहिती

जीवनातील एक महत्त्वाचं स्वप्न म्हणजे घर खरेदी करणे असते. खुद्दच्या मिळकतीमधून एक घर खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते. ते करण्याचं ध्येयही तितकंच असतं. मात्र वार्षिक उत्पन्न आणि घराचा खर्चाचा विचार करता अनेकांना आर्थिक अडचणी येतात. घर, जमीन खरेदी करण्यासाठी गृह कर्जाची गरज लागते. या दरम्यान, ज्या लोकांना घर खरेदी करायचे आहे. त्यांना कोणत्याही बँक किंवा संस्थेकडून कर्ज घेण्यापूर्वी, अटी, कर्जाची रक्कम आणि CIBIL स्कोअर माहित असणे आवश्यक असते. तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती एलआयसी हाऊसिंग फायनान्स पगारदार आणि व्यावसायिक वर्गाला घर, जमीन, दुकान इत्यादी मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज देते.

हेही वाचा : 

अमोल पालेकर पत्नी संध्या गोखलेसह भारत जोडो यात्रेत सहभागी; फोटो आले समोर

तर तुम्हाला एलआयसीचे व्याजदर, सिबिल स्कोअरसह कागदपत्रे इत्यादींची माहिती असणे आवश्यक आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सने गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये गृहकर्जावरील व्याजदरात सुधारणा केली होती. एलआयसीकडून कोणाला आणि किती कर्ज मिळू शकते हे स्पष्ट करताना एलआयसीने कर्जासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादीही जारी केली आहे.

CIBIL स्कोअर, कर्जाची रक्कम आणि व्याज दर

पगारदार आणि व्यावसायिकांसाठी, १५ कोटींपर्यंतचे गृहकर्ज ८०० CIBIL स्कोअरवर ८% व्याजदराने उपलब्ध होईल. CIBIL स्कोअर ७५० ते ७९९असल्यास, पगारदार कर्जदारासाठी ८.०५ टक्के दराने ५ कोटी ते १५ कोटी कर्ज उपलब्ध होईल. CIBIL स्कोअर ७०० आणि ७४९ च्या दरम्यान असल्यास, ५० लाखांच्या कर्जावर ८.२० टक्के व्याजदर असेल. CIBIL स्कोअर ७०० ते ७४९ वर, ५० लाख आणि २ कोटींवरील कर्जावर ८.४० टक्के व्याजदर भरावा लागेल. CIBIL स्कोअर ७०० ते ७४९ वर, २ कोटी ते १५ कोटी पर्यंतच्या कर्जावर ८.५५ टक्के व्याजदर भरावा लागेल.

Raj Thackeray: प्रबोधनकारांच्या पुण्यतिथीदिनी राज ठाकरेंची केली खास पोस्ट शेअर

गृहकर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

एनआरआय रहिवासी पुराव्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड पासपोर्ट आवश्यक आहे सॅलरी स्लिप आणि फॉर्म-१६ बँक स्टेटमेंट ६ ते १२ महिन्यांचे आयटीआर तपशील ३ वर्षांच्या मालमत्ता मालकीचा पुरावा फ्लॅट प्रकरण वाटप पत्र बिल्डर किंवा सोसायटीकडून कर भरणा पावत्या आवश्यक आहेत.

आलिया भट्टला मुलीसाठी पसंत पडले ‘हे’ नाव

Latest Posts

Don't Miss