कोंबडीच्या पिला मागे धावता धावता पाहा कशी बेबी हत्तीची झाली फजिती

हत्ती (Elephant ) कोणाला आवडत नाही! हत्ती बघायला मिळणं म्हणजे पर्वणी असते. हत्तीचे खेळ पाहण्यासाठी बरीच लोक लाखो रुपये खर्च करून त्या पर्यटन स्थळी जातात.

कोंबडीच्या पिला मागे धावता धावता पाहा कशी  बेबी हत्तीची झाली फजिती

हत्ती (Elephant ) कोणाला आवडत नाही! हत्ती बघायला मिळणं म्हणजे पर्वणी असते. हत्तीचे खेळ पाहण्यासाठी बरीच लोक लाखो रुपये खर्च करून त्या पर्यटन स्थळी जातात. सोंडेने पाणी घेणे एकमेकांवर उडवणे, कळपातील हत्ती एकमेकांसोबत खेळात असताना चे चित्र पाहणं या सर्व गोष्टीमधून आपलं हत्तीवरील प्रेम उफाळून येत असते. हत्तीचा कळप काय नुसता हत्ती दिसला, तरी त्याच्याकडे बघत राहावेसे वाटते. लहान मुलाचा देखील हा प्रिय प्राणी आहे . अश्या हत्तीचा खेळकर व्हिडिओ वायरल झालेला आहे.

 

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की लूना नावाचा हत्ती एक कोंबडीचा पाठलाग करत आहे. जंगलात हत्ती एका छोट्या कोंबडीच्या पिलामागे धावते आहे. पण काही केल्या ते कोंबडीच पिल्लू हत्तीच्या हाती येत नाही. पळून पळून हत्ती दामू लागतो. परत धावताना जेव्हा बेबी हत्ती (babyElephant) आपली गती वाढवतो तेव्हा त्याचा पाय मुरगळतो व ते धप्पकन खाली पडते. त्याला गोंडसपणे खाली पडताना बघून हसू काही आवरत नाही. कोंबडीचे पिल्लू मात्र तुरुतुरु धावत हत्ती पासून आपली सुटका करून घेते.

हत्तीच्या बाळाचे व्हिडिओ नेहमीच गोंडस आणि मजेदार असतात आणि इंटरनेटवर अनेकदा पसंतीचे ठरतात. त्यातच आता हत्तीचे बछडे खेळकरपणे कोंबडीचा पाठलाग करताना आणि त्याच्याभोवती फिरतानाचा व्हिडिओ सोशल (social media ) मीडिया प्लॅटफॉर्मवर भन्नाट वायरल होत आहे. @Elephantloveyou नावाच्या पेजने इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ ५० हजार लोकांनी बघितला आहे. हा व्हिडिओ बघून प्रत्येक जण आनंदात हसत आहे. तर काही लोक हत्तीला लागलाय का या काळजीने विचारपूस करणारी कंमेंट (camment) करतायत.

हे ही वाचा:

मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन, मुंबईत १९९३ पेक्षाही मोठा धमाका करणार

भारताने सॉफ्टवेअर उत्पादनांचे केंद्र बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version