Watch Video, कडाक्याच्या थंडीत चक्क हरणाचं तोंड गोठलं, पहा ‘कसा’ वाचवला जीव

रोजच्या जीवनात सोशल मीडियावर (social media) बरेच व्हिडिओ वायरल होत असतात. रोजच्या आयुष्यात जगात काय चालाय याची माहिती आपल्याला मिळत असते.

Watch Video, कडाक्याच्या थंडीत चक्क हरणाचं तोंड गोठलं, पहा ‘कसा’ वाचवला जीव

रोजच्या जीवनात सोशल मीडियावर (social media) बरेच व्हिडिओ वायरल होत असतात. रोजच्या आयुष्यात जगात काय चालाय याची माहिती आपल्याला मिळत असते. काही व्हिडिओ तुफान वायरल होतात तर काही चर्चेत असतात. पण हा गंभीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतंय कि हरणाच्या संपूर्ण तोंडावर बर्फ जमा झाले आहे. यामुळे हरणाला श्वास घेता येत नाही. सध्या या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

अमेरिका (america) आणि कॅनडामध्ये (canada) होणाऱ्या हिमवादळ आणि थंड वाऱ्यांमुळे माणसांप्रमाणे प्राण्यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय कि तोंडावरील बर्फ काढण्याचा हे हरीण (deer) खूप प्रयत्न करत होते पण, त्याला काही केल्या ते जमेना, मग काही वेळाने दोन गिर्यारोहकाने हरणाची हि अवस्था ओळखून त्याचा जीव वाचवण्यास पुढे गेले. सुरवातीला हरीण त्या गिर्यारोहकाला (mountaineer) घाबरत होते पण जेव्हा त्याच्या जीवावर बेतलं तेव्हा ते हरीण निपचित एका जागी पडून राहिले. मग दोन गिर्ह्यारोहकाने हरणाला पकडलं आणि हळू हळू हरणाच्या तोंडावरील बर्फ काढला. बर्फ काढताच हरीण दूर पळून गेले. गिर्यारोहकाने हरणाचा जीव वाचवला आहे. साधारण हरीण हे कधीच कुणाच्या जवळ जात नाही. ते नेहमी आपला जीव वाचवायचा प्रयत्नात असतात. पण यावेळी गंभीर आणि वेगळी घटना पाहायला आपल्याला मिळाली. हरणाच संपूर्णं तोंड बर्फाने गोठलं होतं , काहीच क्षणात हे हरीण बर्फाने गोठून मेले असते. परंतु गिर्ह्यारोहकाच्या मदतीमुळे हरणाच्या तोंडावरी बर्फ निघाला व हरणाचा जीव भांड्यात पडला.

हा व्हिडिओ हाव थिगस वोर (h0w_thlngs_w0r )या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला १६ मिलियन हुन अधिक बघितले गेले आहे. आणि १७ हजाराहून अधिक लोकांनी यावर कंमेंट केली आहे. या व्हिडिओ मध्ये आपल्याला अमेरिकन्स आणि कॅनेडियन लोकांची थंडीत होणारी भीषण अवस्था दिसून येते. अद्याप हा व्हिडिओ नवीन आहे कि मागील वर्षाचा जुना व्हिडिओ आहे हे सिद्ध झालेले नाही.

हे ही वाचा:

पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला झाली सुरुवात

आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर

राजस्थानात रेल्वेचा मोठा अपघात, सूर्यनगरी एक्सप्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version