Watch Video केरळमध्ये नववधुने स्वतःच्याच लग्नात वाचवले पारंपारिक वाद्य, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

लग्न हा सोहळा प्रत्येक नवरी मुलगी आणि नवरा मुलासाठी खूप जास्त महत्वाचा असतो. आपल्या स्वतःच्या लग्नात आपल्या मनाप्रमाणे सर्व व्हावे असं प्रत्येकाला वाटत असते आणि असं झालं कि त्यांना आनंद देखील होत असतो.

Watch Video केरळमध्ये नववधुने स्वतःच्याच लग्नात वाचवले पारंपारिक वाद्य, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

लग्न हा सोहळा प्रत्येक नवरी मुलगी आणि नवरा मुलासाठी खूप जास्त महत्वाचा असतो. आपल्या स्वतःच्या लग्नात आपल्या मनाप्रमाणे सर्व व्हावे असं प्रत्येकाला वाटत असते आणि असं झालं कि त्यांना आनंद देखील होत असतो. हा आनंद साजरा करण्यासाठी नवदांपत्य सुंदर डान्स किंवा गाण गात साजरा करतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर बघायला मिळतात. अश्यातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. त्या व्हिडिओमध्ये केरळमधील नववधूने पारंपारिक ड्रम “चेंडा” वाजवताना दिसत आहे.

@LHBCoach या ट्विटर युजरने एक दिवसापूर्वी हा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ शेअर केल्यापासून तो दोन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि त्याला १४,००० लाईक्स आणि अनेक कमेंट्सही मिळाल्या आहेत. ट्विटरच्या कंमेंट्समध्ये एका व्यक्तीने लिहिले की, “प्रदर्शनातील ही सर्वोत्कृष्ट गुरुकुल परंपरा आहे. वडील चेंदाई गुरु आहेत आणि मुलीनेही प्रभुत्व मिळवले आहे.” दुसरी व्यक्ती म्हणाली, “फक्त अप्रतिम नाही! त्या मुलाला माहित आहे की त्याला फक्त दुसरी सारंगी (जलरा) वाजवायची आहे आणि तिला ढोलकी वाजवायची आहे हे माहित आहे!!! वाह रे वाह! मध्येच, वडील वेळोवेळी येतील. आणखी ड्रम अप करण्यासाठी!!! त्याने कशासाठी साइन अप केले आहे हे वराला माहीत आहे! विचारांची स्पष्टता. ” “सुंदर, वधूला पूर्ण उत्साहाने सहभागी होताना पाहून खूप आनंद झाला,” असं तिसरी व्यक्ती म्हणाली.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींच्या मातोश्री ‘हिराबेन मोदी’ रुग्णालयात दाखल, मोदी अहमदाबादला रवाना

Dharmaveer 2 आनंद दिघेंच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार, धर्मवीर – मुक्काम पोष्ट ठाणे२ लवकरच…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version