G २० परिषद म्हणजे नक्की काय?

९ सप्टेंबर पासून दोन दिवशीय G20 शिखर परिषद चालू होणार आहे. या परिषदेत वेगवेगळ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि परदेशी पाहुणे येणार आहेत.

G २० परिषद म्हणजे नक्की काय?

९ सप्टेंबर पासून दोन दिवसीय G20 शिखर परिषद चालू होणार आहे. या परिषदेत वेगवेगळ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि परदेशी पाहुणे येणार आहेत. शनिवारी सकाळी ९ वाजता या शिखर परिषदेचं उद्घाटन होणा आहे. त्यामुळे दिल्लीत प्रचंड कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे . G20 देशांचे राष्ट्राध्यक्ष तसेच पंतप्रधान आज दिल्लीत दाखल होत आहेत. देशात आलेल्या विदेशी पाहुण्यांना दिल्लीतील गरिबी दिसू नये म्हणून हिरव्या रंगाचे पडदे लावण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये संपूर्ण शहरात १,३०,००० हजार सुरक्षा अधिकाऱयांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. तसेच इथल्या शाळा, कॅालेजना आणि रेस्टॅारंट तीन दिवस पूर्णतः बंद करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.राजधानी दिल्लीमधील प्रगती मैदानात ही परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये नेते रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धावरही चर्चा करणार आहेत. या परिषदेमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हजर राहणार नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंगही परिषदेपासून दूर राहणार आहेत.

G २० परिषदेमध्ये २० शक्तीशाली देशांचे प्रतिनिधी असणार आहे. हे सर्व २० देश मिळून राजकीय, पर्यावरणीय आणि जागतिक प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. G20 देशांचा जागतिक आर्थिक उत्‍पादनात ८५% आणि जागतिक व्‍यापारात ७५ % पेक्षा जास्त वाटा आहे. तसेच यामध्ये लोकसंख्येच्या पातळीचा विचार देखील केला जाणार आहे. G २० परिषदेमध्ये भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूके आणि यूएसचा (अमेरिका) समावेश आहे. या समूहाची स्थापना १९९९ मध्ये करण्यात आली. त्यावेळी देशाचे अर्थमंत्री तसेच अधिकारी आर्थिक स्थैर्य पुन्हा प्राप्त करण्यासाठी चर्चा करत होते. आर्थिक मंदीचा मुकाबला करण्यासाठी २००८ मध्ये पहिल्या नेत्यांची शिखर परिषद आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी भरवण्यात आली. हवामान बदल, शाश्वत ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय कर्जमाफी यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली होती. G २० परिषदेमध्ये विकसित आणि विकसनशील देशांमध्ये आर्थिक विकासावर चर्चा करण्यात येणार आहे.

२०२३ मे मध्ये G २० परिषदेवर चीन आणि सौदी अरेबियाने भारत-प्रशासित काश्मीरमध्ये आयोजित पर्यटनावरील G20 बैठकीवर बहिष्कार टाकला होता. यासाठी काश्मीर कारणीभूत होते. चीनने अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चिन पठार हे चीन क्षेत्र असल्याचा दावा करणारा नकाशा प्रसिद्ध केल्यानंतर भारत आणि चीन यांच्यात अलीकडेच वाद निर्माण झाला आहे.

हे ही वाचा: 

शाहरुख खानचा जवान चित्रपट पाहिल्यावर, अभिनेता क्षितिज दातेनी शेअर केली खास पोस्ट

पुण्यातील गणेश पेठेत लोखंडी सांगाडा कोसळून चार महिला जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version