spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारत-अमेरिका दहशतवादाविरोधात काय म्हणाले, २६/११ चा हिशोब…

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. जेव्हा पासून नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत तेव्हापासून अनेक वेगवेगळ्या अपडेट या येत आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. जेव्हा पासून नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत तेव्हापासून अनेक वेगवेगळ्या अपडेट या येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींनी त्यांचे अमेरिकेचे समकक्ष जो बिडेन यांच्यासोबत एक संयुक्त निवेदन जारी केले, ज्यामध्ये दोन्ही नेत्यांनी रशिया-युक्रेन युद्ध, चीनचे आव्हान, व्यापार करार तसेच पाकिस्तान प्रायोजित दहशतवादावर चर्चा केली आणि लष्कर-चा उल्लेखही केला.

भारत-अमेरिका संयुक्त निवेदन जारी करताना दोन्ही देशांनी पाकिस्तानकडून होणारा सीमेपलीकडील दहशतवाद रोखण्यासंदर्भात निवेदन दिले. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी अल कायदा, लष्कर-ए-तैयबा आणि संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांवर टीका केली. दोन्ही देशांनी अंतर्गत सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दहशतवादाविरुद्ध लढा यासंबंधी सुरक्षा इनपुट एकमेकांना सामायिक करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच वेळी, दोन्ही नेत्यांनी जनरल अॅटॉमिक्स MQ-9B Hale UAVs खरेदी करण्याच्या भारताच्या योजनेचे स्वागत केले. MQ-9B भारतात असेंबल केले जाईल आणि भारतातील विविध सुरक्षा एजन्सी वापरतील. या योजनेंतर्गत, जनरल अॅटॉमिक्स भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतांना चालना देण्याची दीर्घकालीन गरज लक्षात घेऊन तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याचा विचार करेल.

तसेच मुंबई हल्ल्यातील गुन्हेगारांबद्दलच्या त्यांच्या संयुक्त निवेदनात, अमेरिका-भारताने म्हटले आहे की पाकिस्तानने दहशतवादाचे पालनपोषण करणे थांबवावे आणि २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आणि पठाणकोट हल्ल्याचा उल्लेख केला. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये यूएव्ही, ड्रोन आणि इतर लष्करी उपकरणांच्या देवाणघेवाणीचा करारही झाला. दोन्ही देशांच्या सरकारांनी दहशतवाद्यांविरुद्ध संयुक्त लढा सुरू करण्याचे आश्वासनही दिले.

हे ही वाचा:

घरच्या घरी Healthy oats आणि Honey पासून बनवा टेस्टी कुकीज…

शिवसेनाही अभेद्य राहावी ही मनापासून इच्छा, छगन भुजबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss