तिरुपती बालाजीच्या प्रसादाचं नेमकं रहस्य काय ? पोटू आहे तरी काय ?

तिरुपती मंदिरात असंख्य भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपावरून चांगलाच वाद धुमाकूळ घालत आहे.

तिरुपती बालाजीच्या प्रसादाचं नेमकं रहस्य काय ? पोटू आहे तरी काय ?

सर्वात प्रसिद्ध देवस्थान म्हणून नेहमी चर्चेत असणारे तिरुपती बालाजी मंदिर सध्या चांगलेच चर्चेत आहे. जिथे लाखो भाविकांची गर्दी ओसंडून वाहते ते मंदिर आजकाल त्याच्या प्रसादाबद्दल चर्चेत आहे. तिरुपती मंदिरात असंख्य भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपावरून चांगलाच वाद धुमाकूळ घालत आहे. मात्र, लाडू म्हणून दिल्या जाणाऱ्या या प्रसादामागे खूप मोठा इतिहास आहे. हा प्रसाद कसा तयार केला जायचा, याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊया.

तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून तयार केल्या जाणाऱ्या लाडूची परंपरा फार जुनी आहे. प्रसाद म्हणून दिला जाणारा लाडू बरेच दिवस खराब होत नाही. तसेच या लाडूंची किंमत १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत अशी ठेवण्यात आली आहे. तिरुपती मंदिरात मिळणारा हा प्रसाद खूप खास मानला जातो. असे मानले जाते की या प्रसादाशिवाय या मंदिराची यात्रा पूर्ण मानली जात नाही. सध्याच्या घडीला तिरुपती बालाजी देवस्थानतर्फे दररोज सहा लाख लाडू तयार केले जातात. हे लाडू मशीनद्वारे तयार केले जातात आणि लाडू तयार करणारे स्वयांपक घरही वेगळे आहे. या स्वयंपाक घराला ‘पोटू’ असे म्हणतात. येथे फक्त मंदिराचे पुजारी आणि काही खास लोकांनाच प्रवेश दिला जातो. तसेच या ठिकाणी जे स्वयंपाकी काम करतात त्यांच्या स्वच्छतेचीही विशेष काळजी घेतली जाते.

बालाजी मंदिरात लाडू तयार करण्यासाठी एक पद्धत वापरली जाते तिला ‘दित्तम’ असे म्हणतात. आतापर्यंत ६ वेळा हे दित्तम बदलले आहे. सध्या तयार होणाऱ्या प्रसादात बेसन, तूप, काजू, वेलची आणि खडीसाखर हे घटक पदार्थ वापरले जातात. हे मिश्रण मुरवलं जातं आणि त्यानंतर लाडू वळवले जातात. तसेच लाडूसाठी जे तूप वापरण्यात येतं त्यात कुठल्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. पोटूमध्ये दररोज ६२० स्वयंपाकी हे लाडू बनवण्याचे काम करतात. हे लोक पोटू कर्मिकुलु म्हणून ओळखले जातात. या स्वयंपाकीपैकी १५० कर्मचारी नियमित तर ३५० कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने काम करतात. तर २४७ उत्तम शेफ आहेत. लाडू तयार झाला की प्रत्येक बॅचला पहिला लाडू तिरुपती बालाजीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. या लाडूला तिरुपती लड्डू असे विशेष नाव देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

Lalbaughcha Raja ला गणेशभक्तांचं भरभरुन दान, ५ कोटी ६५ लाख जमा तर…

Watch Video : Navra Maza Navsacha 2 च्या भारूडाची तुफान चर्चा…, “५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version