spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Whats App : दोन तासानंतर व्हॉट्सअॅप सेवा पूर्ववत

मोबाइलधारकांसाठी अत्यावश्यक असलेली मेसेंजर सेवा व्हॉट्सअॅपची सेवा ठप्प (Whats App Down) पडली होती. अनेक ठिकाणी युजर्सना अडचण जाणवत होती. मात्र, आता सेवा पूर्वपदावर आल्याची माहिती मिळत आहे. जगभरातील कोट्यवधी मोबाइल युजर्सच्या दैनंदिन आयुष्याचा भाग असलेला मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅप ठप्प झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. अखेर दोन तासानंतर व्हॉट्स अॅपची सेवा पुन्हा सुरू झाली आहे. व्हॉट्सअॅप सुरू झाल्याने युजर्सने सुटकेचा नि:श्वास सोडला.

आज, दुपारी १२.३० वाजण्याच्या आसपास व्हॉटस अॅपवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. इतर संकेतस्थळे सुरू असताना फक्त व्हॉट्स अॅपवरून मेसेज जात नसल्याने युजर्स गोंधळात पडले. त्यानंतर सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारींचा पाऊस पडू लागला. सुरुवातीला, व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये मेसेजचे जात नव्हते. त्यानंतर वैयक्तिक मेसेजिंगलाही अडचणी जाणवत होत्या. अखेर, ट्वीटरवर व्हॉट्सअॅपची सेवा ठप्प झाल्याचे समोर आले. व्हॉट्सअॅपची मालकी असणाऱ्या ‘मेटा’ कंपनीकडूनदेखील तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. मात्र, व्हॉट्सअॅप सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ‘मेटा’च्या प्रवक्त्यांनी सांगितले.

रॉयटर्सच्या मते, आशिया, युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका आणि युरोपमधील वापरकर्ते व्हॉट्सअॅपवर मजकूर आणि व्हिडिओ पाठवताना आणि प्राप्त करताना समस्यांची तक्रार करत आहेत. सुमारे १२.३० वाजता, आउटेज रिपोर्टिंग साइट डाउनडिटेक्टरने दाखवले की युनायटेड किंगडममध्ये ६८,००० हून अधिक वापरकर्त्यांनी अॅपसह समस्या नोंदवल्या आहेत. सिंगापूरमध्ये १९,००० आणि दक्षिण आफ्रिकेत १५,०००लोकांनी समस्या नोंदवल्या.

हे ही वाचा :

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Ram Setu Twitter Review : राम सेतू चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिल्या रिअँक्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss