Whatsapp news : व्हॉट्सअॅप डाऊन, सेवांमध्ये व्यत्यय येत असल्याची वापरकर्त्यांची तक्रार

Whatsapp news : व्हॉट्सअॅप डाऊन, सेवांमध्ये व्यत्यय येत असल्याची वापरकर्त्यांची तक्रार

व्हॉट्सअॅप सेवेच्या वापरण्यात अडचणी निर्माण होत आहे. अनेक वापरकर्ते अॅपवर संदेश पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात समस्या होत आहे. जगभरातील ऑनलाइन आउटेजचा मागोवा घेणाऱ्या डाउनडिटेक्टर या वेबसाइटने व्हॉट्सअॅपच्या आउटेजची तक्रार करणाऱ्या वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ दिसत आहे. महत्वाचे म्हणजे व्हॉट्सअॅप कडून या बाबत अधिकृत माहित सामोर आली नाही.

आज दुपारी १२.३० वाजण्याच्या आसपास व्हॉटस अॅपवरून वापरकर्त्यांना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. सुरुवातीला इंटरनेटची समस्या असू शकते असे अनेकांना वाटत होते. मात्र, इतर संकेतस्थळे सुरू असताना फक्त व्हॉट्स अॅपवरून मेसेज जात नसल्याने वापरकर्त्यांचा गोंधळात पडले. त्यानंतर सोशल मीडियावर वापरकर्त्यांकडून तक्रारींचा पाऊस पडू लागला. काही वेळेत ट्वीटरवर #WhatsAppDown चा ट्रेंड सुरू झाला. व्हॉट्स अॅपची मालकी असणाऱ्या मेटा कंपनीकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

Exit mobile version