spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Whatsapp : व्हॉट्सॲप बंद पडल्यास हे असतील बेस्ट ऑपशन

व्हॉट्सअप (WhatsApp) हे असे प्लॅटफॉर्म आहे जे जगभरातील भरपूर प्रमाणात चालते. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये (smartphone) व्हॉट्सअप हे असते. आजकाल व्हॉट्सअप मेसेजिंग अ‍ॅपचा वापर फक्त वैयक्तिक चॅट आणि कॉलपुरता मर्यादित राहिला नाही. आजकाल व्हॉट्सअपचा मदतीने आपण ग्रुपवर देखील मेसेज करू शकतो. तसेच आपण व्हिडिओ कॉल (Video call), व्हॉइस कॉल (Voice call) देखील करू शकतो.

काल व्हॉट्सॲप (Whatsapp) २ तासासाठी बंद झाल्यास सर्वांची तारांबळ उडाली होती. त्यामुळे महत्वाची कामे थांबली होती. त्यानंतर व्हॉट्सॲप (Whatsapp) चालू झाल्यावर सगळ्यांनी दिलासानक श्वास घेतला. असे पुन्हा झाल्यास तुम्ही दुसरे बेस्ट ऑपशन वापरू शकता. त्यामुळे तुमची कामे करण्याची थांबणार नाही. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट ऑपशन सांगणार आहोत.

व्हॉट्सॲप (Whatsapp) बंद झाल्यास तुम्ही टेलिग्राम (Telegram) वापरू शकता. तसेच टेलिग्राम (Telegram) हे अँड्रॉइड (Android) फोन मध्ये वारले जाते. टेलीग्रामचा दैनंदिन वाढीचा दर प्रमाणापेक्षा जास्त आहे आणि एका दिवसात इतर प्लॅटफॉर्मवरून ७०० दशलक्षाहून अधिक लोक वापरतात. टेलिग्राम (Telegram) मध्ये देखील व्हॉट्सॲप (Whatsapp) सारखे पर्याय पाहायला मिळतात. जसे की संदेशांवर प्रतिक्रिया (React to messages) , परस्परसंवादी स्टिकर्स (Interactive stickers) , पाठवलेले संदेश संपादित करणे (Editing sent messages), ऑडिओ संदेशांना मजकूरात रूपांतरित करा (Convert audio messages to text) , टेलीग्राम बॉट्स (Telegram bots) या सारखे पर्याय पाहायला मिळतात. टेलिग्राममुळे तुमची कामे देखील थांबणार नाही.

इन्स्टाग्राम (instagram) देखील तुम्ही वापरू शकता. इन्स्टाग्राम मुळे देखील तुमचे महत्वाचे काम होऊ शकते. इन्स्टाग्राम (instagram) मध्ये देखील नवीन नवीन पर्याय पाहायला मिळतात. निर्माता शोधा (Find the manufacturer), रीमिक्स फोटो (Remix photo) , व्हिडिओ कॉल (Video call) , व्हॉइस कॉल (Voice call), मेसेजिंग (messaging) , इत्यादी तुम्ही करू शकता.

जिओ चॅट (Jio Chat) हे चॅटिंग अ‍ॅप देखील तुम्हाला उपयुक्त ठरेल. पण केवळ Jio यूझर्सच हे अ‍ॅप वापरु शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमच्या जिओ कॉन्टक्ट्सच्या संपर्कात राहू शकता.

Latest Posts

Don't Miss