spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Whatsapp New Feature : व्हॉट्सॲपचं नवं फिचर अनोखे ! घ्या जाणून संपूर्ण माहिती

इन्स्टंट मेसेजिंग अँप WhatsApp वर तुम्हाला लवकरच एक नवीन फीचर मिळणार आहे. व्हॉट्सअँप आपल्या वापरकर्त्यांना नवीन फिचर्स देण्यासाठी सतत अनेक बदल करत असते.

इन्स्टंट मेसेजिंग अँप WhatsApp वर तुम्हाला लवकरच एक नवीन फीचर मिळणार आहे. व्हॉट्सअँप आपल्या वापरकर्त्यांना नवीन फिचर्स देण्यासाठी सतत अनेक बदल करत असते. आता लवकरच व्हॉट्सअँपवर फोटो एडिट करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

व्हॉट्सॲप इंटरेस्टिंग बनवण्यासाठी वेळोवेळी अपडेट केलं जातं. या अपडेट्स स्टेबल वर्जनमध्ये रिलीज करण्याआधी बीटा वर्जनमध्ये चेक केल्या जातात. अलीकडेच ॲपमध्ये एक नवं वर्जन स्पॉट केल्या गेलंय. लवकरच आता व्हॉट्सॲपवर फोटो पाठवण्याआधीच ब्लर करता येणार आहे. कंपनी नव्या फिचरच्या ड्रॉइंग टूलवर काम करत आहे. ज्याच्या मदतीने आता फोटो ब्लर करता येणार आहे. नव्या फिचरच्या मदतीने तुम्ही फोटोच्या कुठल्याही पार्टला सहज ब्लर करू शकता.

नव्या फिचरचा वापर करत तुम्ही फोटोचा कुठलाही एकच पार्ट ब्लर करू शकाल. व्हॉट्सॲपने दोन ब्लर टूलचे ऑप्शन्स दिले आहेत. याशिवाय या फिचरच्या मदतीने यूजर्स व्हॉट्सॲप प्रोफाइल पिक्चर सेट करता येऊ शकेल. सोबतच यूजर्सला कॅप्शन देण्याचंही ऑप्शन मिळेल. ज्याच्या मदतीने यूजर्स कुठलेही डॉक्युमेंट्स पाठवण्याआधी कॅप्शन लिहू शकेल.

व्हॉट्सॲपचं हे नवं फिचर सध्या बीटा फेजमध्ये आहे तसेच ते ‘WABetaInfo’ मध्ये स्पॉट केल्या गेलंय. वर्षाच्या सुरूवातीलाच पब्लिकेशनने व्हॉट्सॲपच्या या नव्या फिचरवर काम करणार असल्याची माहिती दिली होती. अलीकडेच नव्या फिचरचा एक स्क्रिनशॉटही पुढे आलाय.

हे ही वाचा:

Onion price : नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक घटल्याने दरात दुप्पट वाढ, जाणून घ्या नवीन दर

अनेक वर्षाच्या खंडानंतर ऐश्वर्या राय बच्चन यांचे मोठ्या पडद्यावर आगमन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss