Wednesday, October 2, 2024

Latest Posts

Whatsapp News Feature: व्हॉट्सॲप घेऊन येणार नवं फीचर, आता सेंड केलेले मेसेजही करता येणार एडिट

WhatsApp च्या नवीन फीचर ट्रॅकिंग वेबसाइट WABetaInfo ने या आगामी WhatsApp फीचरची माहिती दिली आहे.

इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp वर तुम्हाला लवकरच एक नवीन फीचर मिळणार आहे. व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना नवीन फिचर्स देण्यासाठी सतत अनेक बदल करत असते. आता लवकरच व्हॉट्सअॅपवर मेसेज एडिट करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. WhatsApp च्या नवीन फीचर ट्रॅकिंग वेबसाइट WABetaInfo ने या आगामी WhatsApp फीचरची माहिती दिली आहे.

व्हॉट्सअॅपच्या एडिट मेसेज फीचरच्या मदतीने मेसेज पाठवल्यानंतरही आरामात एडिट करता येणार आहे. व्हॉट्सअॅप मेसेज एडिटिंग फीचरचा स्क्रीनशॉटही समोर आला आहे. Wabetainfo ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, WhatsApp एडिट फीचरवर काम करत आहे आणि आता त्याची टेस्टिंग देखील सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी हे फीचर व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉईड बीटा व्हर्जनमध्ये दिसले होते. आता लवकरच सोशल मीडिया कंपनी व्हॉट्सअॅपसाठी हे फीचर जारी करू शकते.

Wabetainfo च्या रिपोर्टनुसार, या फीचरमध्ये यूजर्स मर्यादित काळासाठी मेसेज एडिट करू शकतील. मात्र, अद्याप याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. पाठवलेला संदेश एडिट करण्यासाठी वापरकर्त्यांना मजकूरावर दीर्घकाळ दाबावे लागेल, त्यानंतर एडिट बटण पॉप-अप होईल, यामुळे संदेश एडिट करता येईल.

एडिट मेसेजसोबतच तुम्हाला लवकरच व्हॉट्सअॅपवर तारखेनुसार जुने मेसेज पाहण्याचा पर्यायही मिळणार आहे. या फीचरला सर्च मेसेज बाय डेट असे नाव देण्यात आले आहे. या फीचरमध्ये तुम्हाला सर्च सेक्शनमध्ये आणखी एक नवीन कॅलेंडर आयकॉन दिसेल, या आयकॉनवर टॅप करून तुम्ही तारखेनुसार मेसेज पाहू शकाल.

हे ही वाचा:

शी जिनपिंगची राजवट संपणार? शी जिनपिंगविरुद्ध चीनी जनतेने पुकारला बंड, कम्युनिस्ट राजवटीत लोकांचा विरोध…

MBA चायवाल्यानंतर व्हायरल होतोय B.Com इडलीवाल्याचा व्हिडिओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss