भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणते पुरस्कार देण्यात आले ???

अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला आहे. त्यांच्या या गौरवात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे आणि दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसून येते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणते पुरस्कार देण्यात आले ???

अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला आहे. त्यांच्या या गौरवात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे आणि दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसून येते. या पुरस्कारांमुळे जागतिक स्तरावर होत असलेल्या भारताच्या उदयाला अधिक बळ मिळाले आहे. जगभरातील देशांबरोबर भारताचे वृद्धिंगत होत असलेले संबंधही हे जुळत असताना बघायला मिळत आहे. अनेक देशांच्या सर्वोच्च नागरी सन्मानांव्यतिरिक्त, जगभरातील अनेक प्रतिष्ठित संस्थांनीही पंतप्रधान मोदींचा विविध पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांच्या काळात मिळालेले सर्वोच्च सन्मान मिळाले. गेल्या नऊ वर्षांच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकूण तेरा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

इजिप्तचा (Egypt) सर्वोच्च सन्मान असलेला ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ या पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्रल मोदींना मिळालेला हा १३वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इजिप्तचे राष्ट्रपती अल – सीसी यांच्या हस्ते पंतप्रधानांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द नाईल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी दिली. त्यांनी म्हटलं की, ‘हा इजिप्तचा सर्वोच्च राजकीय पुरस्कार आहे.’ पंतप्रधान मोदी यांच्या इजिप्तच्या दौऱ्यामुळे इजिप्तच्या अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मूळचे भारतीय असलेले बोहरा मुस्लिम समाजाचे सदस्य शुजाउद्दीन शब्बीर तांबावाला यांनी म्हटलं की, ‘आजचा दिवस आमच्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे कारण पंतप्रधान मोदी यांनी अल – हकीम या मशीदीला भेट देऊन आमच्यासोबत संवाद साधला.’

मे २०२३ – कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, पापुआ न्यू गिनी या देशाने प्रदान केलेला सर्वेच्च नागरी पुरस्कार
मे २०२३ – – कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी , पंतप्रधान मोदी यांच्या जागतिक नेतृत्वाची ओळख म्हणून फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान.
मे २०२३ – – पलाऊ देशाकडून देण्यात आलेला इकबाल पुरस्कार.
डिसेंबर २०२१ – ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो, भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.
२०२० – लीजन ऑफ मेरिट, अमेरिकेच्या सशस्त्र दलाने दिलेला पुरस्कार.
२०१९ – किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसाँ, आखाती देशाचा सर्वोच्च सन्मान.
२०१९ – ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुल ऑफ निशान इज्जुद्दीन, मालदिवकडून परदेशी मान्यवरांना देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान.
२०१९ – ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू पुरस्कार, रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान.
२०१९ – ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार, संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च नागरी सन्मान.
२०१९ – ग्लोबल गोलकीपर पुरस्कार, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून स्वच्छ भारत अभियानासाठी करण्यात आलेला सन्मान.
२०१८ – ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार, पॅलेस्टाईनकडून परदेशा मान्यवरांना देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान.
२०१६ – स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्ला खान , अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
२०१६- ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सौद, सौदी अरेबियाचा सर्वोच्च सन्मान.

हे ही वाचा:

शरद पवारांनी दिले फडणवीसांना खोचक शब्दात उत्तर

प्रत्येक भारतीय Adipurusha पाहणार, चित्रपटाचे तिकीट फक्त ११२ रुपये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version