भारतीय पासपोर्ट तीन वेगवेगळ्या रंगांचे का असतात ? जाणून घ्या पासपोर्टच्या रंगाचा अर्थ

परदेशात जाणं म्हटलं की पहिली गोष्ट लक्षात येते ते म्हणजे पासपोर्ट (Passport) त्यानंतर व्हिसा (Visa) महत्त्वाचा असतो. पासपोर्ट नसेल तर तुमची सगळी तयारी असूनही काहीही उपयोग नसतो. हा पासपोर्ट म्हणजे आपल्या देशाबाहेर विदेशात आपण भारतीय नागरिक (Indian Citizen) असल्याची ओळख असते.

भारतीय पासपोर्ट तीन वेगवेगळ्या रंगांचे का असतात ? जाणून घ्या पासपोर्टच्या रंगाचा अर्थ

Passport Colours : परदेशात जाणं म्हटलं की पहिली गोष्ट लक्षात येते ते म्हणजे पासपोर्ट (Passport) त्यानंतर व्हिसा (Visa) महत्त्वाचा असतो. पासपोर्ट नसेल तर तुमची सगळी तयारी असूनही काहीही उपयोग नसतो. हा पासपोर्ट म्हणजे आपल्या देशाबाहेर विदेशात आपण भारतीय नागरिक (Indian Citizen) असल्याची ओळख असते. कोणत्याही नागरिकाला परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट महत्त्वाचा असतो. प्रत्येक देशाचा पासपोर्ट हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ज्यामुळे तेथील नागरिकांची सहज ओळख होऊ शकते. मात्र, तुम्हाला माहित हे का, की भारताचा पासपोर्ट हा एक नसून अनेक रंगांचा असतो. प्रत्येक रंगाच्या पासपोर्टचा वेगळा विशेष असा अर्थ असतो. आज आम्ही तुम्हाला पासपोर्टच्याच काही खास गोष्टी सांगणार आहोत. वेगवेगळ्या रंगांच्या पासपोर्टचा नेमका अर्थ काय ते जाणून घ्या.

भारतीय पासपोर्टचे रंग कोणते?

पासपोर्ट भारत सरकारद्वारे जारी केले जातात. पूर्वी पासपोर्ट बनवायला खूप वेळ लागत असे. पण आता तुम्ही सहज बनवू शकता. भारतीय पासपोर्ट तीन वेगवेगळ्या रंगांचा असतो. नागरिकांच्या सामाजिक स्तरानुसार या पासपोर्टचा खरा उद्देशही वेगळा आहे. जाणून घ्या निळ्या, पांढर्‍या आणि मरून पासपोर्टबद्दल काही खास रंजक गोष्टी.

पांढरा पासपोर्ट (White Colour Passport) :

काही अधिकृत कामासाठी परदेशात जाणाऱ्या अधिकृत व्यक्तीला पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो. ज्या लोकांना हा पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो त्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारी व्यक्तीला काही विशेष वागणूक दिली जाते. पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट असलेल्या व्यक्तीलाही काही विशेष सुविधा मिळतात.

निळ्या रंगाचा पासपोर्ट (Blue Colour Passport) :

निळ्या रंगाचा पासपोर्ट देशातील सर्वसामान्यांसाठी बनवण्यात आला आहे. या पासपोर्टमध्ये पासपोर्टमधील व्यक्तीच्या नावाव्यतिरिक्त त्या व्यक्तीची जन्मतारीख आणि स्थानिक पत्त्याची माहिती दिली जाते. याबरोबरच ओळखीसाठी फोटो, सही, शरीरावरील कोणतीही खूण याची माहितीही देण्यात आली आहे. पासपोर्टवर एखाद्या देशाचा व्हिसा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सहज प्रवास करता येतो.

मरून रंगाचा पासपोर्ट (Maroon Colour Passport) :

मरून रंगाचे पासपोर्ट फक्त भारतातील मुत्सद्दी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच दिले जाऊ शकतात. यामध्ये आयएएस आणि वरिष्ठ आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ज्या लोकांकडे हा पासपोर्ट आहे त्यांना परदेशात जाण्यासाठी व्हिसा घेण्याचीही गरज नाही. तसेच, त्यांची इमिग्रेशन प्रक्रिया देखील इतरांच्या तुलनेत खूप सोपी आणि जलद होते. परदेशात गेल्यानंतर अशा व्यक्तीवर सहजासहजी गुन्हा दाखल करता येत नाही.

केशरी पासपोर्ट :

याशिवाय भारत सरकारकडून नागरिकाची ओळख म्हणून केशरी रंगाचाही पासपोर्ट दिला जातो. हा पासपोर्ट १० वी पर्यंत शिक्षण झालेल्या नागरिकांसाठी असतो. यावर वडिलांचे नाव, सध्याचा पत्ता आणि अन्य महत्वपूर्ण माहिती असते.

हे ही वाचा : 

Mission Majnu अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘मिशन मजनू’ची रिलीज डेट झाली जाहीर

Bigg Boss Marathi 4 : किरण माने आणि प्रसाद जावडे यांच्यातील वाद मारामारीपर्यंत पोहोचला ? पहा नेमक काय झालं.

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version