फोन उचलल्यावर सर्वात आधी आपण ‘Hello’ का बोलतो?

हॅलो हा शब्द फार सामान्य आहे. आपल्या दैनंदिन जीवनात हॅलो हा शब्द आपण नेहमीच बोलत असतो. कुणाला फोन केल्यानंतर किंवा फोन आल्यानंतर आपण सर्वात प्रथम हॅलो बोलतो.

फोन उचलल्यावर सर्वात आधी आपण ‘Hello’ का बोलतो?

हॅलो हा शब्द फार सामान्य आहे. आपल्या दैनंदिन जीवनात हॅलो हा शब्द आपण नेहमीच बोलत असतो. कुणाला फोन केल्यानंतर किंवा फोन आल्यानंतर आपण सर्वात प्रथम हॅलो बोलतो. हॅलो हा तसा आहे तर इंग्रजी शब्द. परंतु तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की फोनवर बोलताना सर्वात आधी हॅलो हा शब्दच का बोलला जातो? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात..

मोबाईल असू दे किंवा लँडलाइन फोन वाजताच रिसिव्ह करताच प्रत्येक जण हॅलो म्हणतो. मग तो गरिब असो, श्रीमंत असो, लहान किंवा ज्येष्ठ, स्त्री किंवा पुरुष कोणीही असो हॅलोच म्हटलं जातं. आश्चर्य म्हणजे आज अगदी बहुतेक जगातल्या सगळ्याच देशांमध्ये कॉलवर हॅलो म्हंटलं जातं. हा जुना जर्मन शब्द हाला किंवा होलापासून आला आहे. हाला किंवा होलाचा अर्थ हा कसे आहात असा होतो. जसा जसा काळ पुढे जाऊ लागला तसा हा शब्ह होलाहून हालो बनल आणि नंतर हालू झाला. हळूहळू हा शब्द कायमस्वरूपी हॅलो बनला.

कॉल करताना हॅलोचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी हे माहित असावे की टेलीफोनचा शोध कोणी लावला. अलेक्झांडर ग्राहम बेल यांना टेलीफोन बनवण्याचं श्रेय दिलं जातं. त्यांनी १८७६-७७ दरम्यान याचा शोध लावला होता. ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव मार्गारेट हेलो असे होते. टेलिफोनचा शोध लावल्यानंतर, ग्राहम बेलने आपल्या मैत्रिणीला फोन केला आणि तिचे नाव घेत हेलो म्हटले. यानंतर फोनवर हेलो शब्द बोलण्याचा ट्रेंड सुरु झाला.

हॅलो या शब्दाचा अर्थ डिक्शनरीमध्ये नाही, तर ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये हॅलो या शब्दाचा अर्थ स्वागत, अभिव्यक्ती, अभिवादन, सलाम असा दिला आहे. म्हणूनच जेव्हा आपण एखाद्याला भेटतो किंवा हस्तांदोलन करतो तेव्हा आपण नमस्कार म्हणतो.

हे ही वाचा:

BJP चे बावनकुळे Casino मध्ये, ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदानंतर राजकारण रसातळाला

BJP चे बावनकुळे Casino मध्ये, ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदानंतर राजकारण रसातळाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version