National Farmer’s Day 2022 २३ डिसेंबरला ‘शेतकरी दिवस’ का साजरा केला जातो ?

National Farmer’s Day 2022 २३ डिसेंबरला ‘शेतकरी दिवस’ का साजरा केला जातो ?

शेती प्रधान भारतात दरवर्षी राष्ट्रीय किसान दिवस म्हणजेच राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात येतो. ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ हा दरवर्षी भारतात २३ डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिन ‘शेतकरी दिन’ (farmer day)  म्हणून साजरा केला जातो. माजी पंतप्रधान चौधरी सिंह (chaudhary singh ) यांनी समाजात शेतकऱ्यांना मानाचं स्थान देण्यासाठी अनेक धोरणांची सुरवात केली . त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योगदानासाठी भारत सरकारने चौधरी सिंह  (chaudhary  singh ) यांच्या सन्मानार्थ २००१ पासून २३ डिसेंबर हा शेतकरी दिवस म्हणून साजरा करावा असा निर्णय घेतला .

 

चौधरी सिंह हे अत्यंत्य साध जीवन जगणार व्यक्तिमत्व होते. २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० पर्यंत त्यांनी अत्यंत अल्प कालावधीसाठी पंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली. आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांच जीवन सुधारावे यासाठी अनेक धोरण केली . चौधरी चरणसिंह यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि शेतकर्‍यांच्या हिताच्या विविध धोरणांनी भारतातील सर्व शेतकर्‍यांना जमीनदार आणि धनदांडग्यांच्या विरोधात एकत्र केले. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेल्या ‘जय जवान जय किसान’ या प्रसिद्ध घोषणेचे त्यांनी पालन केले.

चौधरी चरणसिंह हे एक अतिशय यशस्वी लेखक देखील होते आणि त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली ज्यात शेतकरी आणि त्यांच्या समस्यांबद्दल, शेतकऱ्यांच्या हिताबाबत त्यांचे विचार मांडले गेले. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांनी समाजात इतर लोकांसारखे मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. बऱ्याच चांगल्या उपाययोजना, धोरणांचा उपयोग करून त्यांनी शेतकऱ्यांचे जीवन सार्थकी लावले. शेतकऱ्यांना मानाचं, हक्काचं घर मिळवून दिल. त्यांच्या आयुष्याला एक चांगली दिशा दिली . शेतकऱ्यांची भक्ती आणि त्याग त्यांनी ओळखल होत . शेतकऱ्यांचे भविष्यात होणारे हाल त्यांना तेव्हाच कळून आले असावे .शेतकऱ्यांचे सामाजिक आणि आर्थिक कल्याण सुनिश्चित करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण केली . म्हणून आज शेतकर्‍यांना सर्वात अद्ययावत कृषी ज्ञान प्रदान करण्यासाठी, त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी या दिवसाचा उपयोग केला जातो.

हे ही वाचा : भारतात BF.7 Variant चे ४ रुग्ण, आरोग्य मंत्र्यांची बोलावली महत्वाची बैठक, जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

 

Exit mobile version