का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय शांतता दिवस? जाणून घ्या त्याचे महत्व व इतिहास

का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय शांतता दिवस? जाणून घ्या त्याचे महत्व व इतिहास

आपल्या जीवनात शांतता असणे फार महत्वाचे असते. शांततेशिवाय जगण्याला अर्थ नाही, ज्या ठिकाणी शांती असते त्या ठिकाणी बंधुभाव, समाधान,मधुरता आणि आनंद असतो. दर वर्षी २१ सप्टेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय शांतता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे जगातील सर्व देशांमध्ये आणि लोकांमध्ये शांतता टिकून राहावी. शांत आणि आनंददायी वातावरणाला प्रोहत्साहन मिळावे, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९८१ मध्ये या दिवसाची सुरवात केली. हा दिवस १९८२ पासून ‘Right to peace of people’ या थीमसह सुरु करण्यात आला. १९८२ ते २००१ पर्यंत, सप्टेंबरचा तिसरा मंगळवार हा दिवस आंतराष्ट्रीय शांतता दिवस किंवा जागतिक शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. दोन दशकानंतर,२००१ मध्ये,संयुक्त राष्ट्राच्या महासभेने एकमताने हा दिवस अहिंसा आणि युद्धविराम दिन म्हणून घोषित केला.

जगभरामध्ये शांततेचा संदेश देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने साहित्य, कला, संगीत चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रामधील नामवंत व्यक्तींना शांतता दूत म्हणून नियुक्त करण्यात आले. जागतिक शांतता दिवस हा पांढरे कबूतर उडवून शांततेचा संदेश दिला जातो आणि एकमेकांनी शांतता राखावी अशी अपेक्षा केली जाते. पांढऱ्या कबूतराला शांततेचे प्रतिक मानले जाते. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघाकडून विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये, संस्थांमध्ये शांतता दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले जाते. जीवनाचे प्रमुख ध्येय शांती आणि आनंद प्राप्त करणे आहे, ज्यासाठी मनुष्य सतत प्रयत्नशील असतो. जगामधील सर्व देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.

काय आहे यावर्षीची थीम?
संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी थीमद्वार आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा करण्याचे आवाहन करते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा करण्यासाठी एक थीम आणली आहे. या वर्षाची थीम आहे समान आणि शाश्वत विकासासाठी उत्तम पुनप्राप्ती, वंशवाद संपवा, शांतता निर्माण करा. म्हणजेच जातीयवाद दूर करा, शांततेला प्रोत्साहन द्या. युनायटेड नेशन्सचा असा विश्वास आहे की, खऱ्या शांततेचा अर्थ म्हणजे केवळ हिंसाचार नष्ट करणे हा नाही, तर एका अश्या जगाचा निर्माण करणे, जिथे जातीचा विचार न करता, प्रत्येकाला समान वागणूक दिली जाईल आणि जिथे लोकांची सर्वांगीणदृष्ट्या भरभराट होईल.

PM Narendra Modi देशातील भ्रष्टाचाराचे सरदार, गांधी कुटुंबावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही: Nana Patole

Exit mobile version