मोदींनी दिली ‘भारत जोडो यात्रे’ला वॉर्निंग! राहुल गांधी घेतील का मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मोदींनी दिली ‘भारत जोडो यात्रे’ला वॉर्निंग! राहुल गांधी घेतील का मोठा निर्णय, वाचा सविस्तर

जगावर असलेल्या कोरोना (CoronaVirus) नावाचं संकट मागे सारुन तब्बल दोन वर्षांनी सगळं सुरळीत सुरु झालं होतं, मात्र आता पुन्हा एकदा संपूर्ण जगावर या जीवघेण्या व्हायरलचं संकट घोंगावू लागलंय. फक्त चीनच (China) देशात नव्हे तर जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्ये देखील कोरोनानं पुन्हा डोकं वर काडत असलयाचे दिसत आहेय. त्यामुळे भारतानं सावध (Prime Minister Narendra Modi) होत उपाययोजना आखायला आता सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (मुख्यमंत्री अशोक गेहलोत) यांना पत्र लिहून राजस्थानमधून बुधवारी हरियाणात दाखल झालेल्या भारत जोडो यात्रेत कोविडच्या योग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात आहे की नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे.

हेही वाचा : 

ग्रामपंचायतीच्या निकालांचं सेलिब्रेशन करत आहात पण आधी महाराष्ट्रातील गावं कर्नाटकात चाललीत ते पाहा, संजय राऊत

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोरोनाच्या प्रसारावर चिंता व्यक्त केली आहे. तर आरोग्यमंत्री यांनी आपल्या पत्रात म्हटले की, कोरोना महामारी ही सार्वजनिक आपत्ती आहे. त्यामुळे देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेता येईल. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे तसेच यात्रेदरम्यान सर्वांनी मास्क आणि सॅनिटायजरटचा वापर करावा. भारत जोडो यात्रेत फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना सहभागी होण्याची परवानगी द्यावी.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी देशातील कोविड-१९ (Covid-19) परिस्थितीबाबत वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. एएनआय वृत्तसंस्थेना दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक ११:३० वाजता सुरू होईल. या बैठकीमध्ये इतर देशांतील कोविड १९ परिस्थितींचाही आढावा घेण्यात येईल. यानंतर परिस्थिती पाहता नवे निर्बंध लागू होण्याबाबत निर्णय होऊ शकतो.

Republic Day यंदा प्रजासत्ताक दिन परेडसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार

सध्या देशात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे. दररोज नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील घटली आहे. देशात काल ११२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. काही महिन्यांपूर्वी दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. आतापर्यंत देशात ४ कोटी ४६ लाख ७६ हजार १९९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील ४ कोटीहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.

Coronavirus in China चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक ! व्हिडीओ होतोय व्हायरल

Exit mobile version