spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ब्रह्मास्त्र रिलीजसह, आयनॉक्स आणि पीव्हीआरच्या स्टॉक्समध्ये झाली मोठी घसरण

ब्रह्मास्त्र आणि पीव्हीआर (PVR) आणि आयनॉक्स (INOX) सारख्या मल्टिप्लेक्स साखळ्यांचा शुक्रवार खराब आहे.

ब्रह्मास्त्र आणि मल्टिप्लेक्स या दोन्हींसाठी शुक्रवार खराब आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आज आयनॉक्स आणि पीव्हीआर यांच्या समभागात मोठी घसरण झाली आहे.

ब्रह्मास्त्र हा सर्वात महागडा भारतीय चित्रपट आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. मल्टिप्लेक्स चेन पीव्हीआर (PVR) च्या शेअर्सने गेल्या दोन आठवड्यांमध्ये 10% वाढ नोंदवली आहे कारण विविध चित्रपटांचा प्रचंडबोलबाला सुरु होता. तथापि, ब्रह्मास्त्र आणि पीव्हीआर (PVR) आणि आयनॉक्स (INOX) सारख्या मल्टिप्लेक्स साखळ्यांचा शुक्रवार खराब आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र भाग १: शिवाने समीक्षकांच्या नकारात्मक पुनरावलोकनांना तोंड दिले आहे. अनेक समीक्षकांनी या चित्रपटाला खूप कमी रेटिंग दिल्याची बाब देखील समोर आली आहे.

आयनॉक्स आणि पीव्हीआर शेअर्सना आज चांगलाच फटका बसला आहे. दुपारी १ वाजता, आयनॉक्सचा शेअर ५% पेक्षा जास्त घसरला आणि ४९३.२० रुपये प्रति शेअर व्यवहार केला. दिवसाच्या पहिल्या सहामाहीत ५% नी घसरल्याने पीव्हीआर (PVR) शेअर्समध्येही आज घसरण झाली आहे. सध्या १८४३.४८ रुपयांवर व्यवहार होत असताना, पीव्हीआर (PVR) शेअर्स दुपारी १ वाजता ४.७१% ने घसरले आहेत.

ट्विटर वापरकर्ते ब्रह्मास्त्रला रिलीजच्या पहिल्याच दिवशी मिळालेला खराब प्रतिसाद आणि त्यानंतर आयनॉक्स आणि पीव्हीआरच्या शेअर्समध्ये झालेली घसरण यावर तोंडसुख घेत आहेत.

पीव्हीआर (PVR) ने दावा केला आहे की त्यांनी आगाऊ बुकिंग दरम्यान ब्रह्मास्त्रची १,२५,००० पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली आहेत. समीक्षक आणि प्रेक्षक यांचे परीक्षण लक्षात घेता ब्रह्मास्त्रचे भविष्य अंधकारमय दिसत आहे. काल्पनिक चित्रपट ४०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. यात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन अक्किनेनी आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

ट्विटर वापरकर्त्यांनी आधीच याला ‘मोठा’ फ्लॉप घोषित केले आहे. काही ट्वीट पहा:

हे ही वाचा:

INOX मध्ये विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी PVR भागधारक, कर्जदारांची ११ ऑक्टोबर रोजी घेणार बैठक

पुण्यातील अलका चौकात शिवसेनेच्या बॅनरने वेधले सर्वांचे लक्ष, उद्धव ठाकरेंसोबत आनंद दिघेंच्या फोटोची चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss