सीटसाठी महिलांनी लोकल ट्रेनलाच बनवला आखाडा; हाणामारीत महिला पोलिस जखमी

तुर्भे स्थानकाजवळ एका सीटवरून तीन महिला प्रवाशांमध्ये वाद झाला. यानंतर हाणामारी सुरू झाली.

सीटसाठी महिलांनी लोकल ट्रेनलाच बनवला आखाडा; हाणामारीत महिला पोलिस जखमी

मुंबई लोकल ट्रेनमध्ये दोन महिला गटांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्रेनमधील सीटवरून महिलांमध्ये वाद सुरू झाला आणि नंतर तो इतका वाढला की ट्रेनच्या डब्याचे आखाड्यात रूपांतर झाले. यादरम्यान भरपूर बॉक्सिंग झाली आणि महिला एकमेकांचे केस ओढताना दिसल्या. एवढेच नाही तर या मारामारीत कर्तव्यावर असलेली एक महिला पोलीसही जखमी झाली.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ठाणे-पनवेल लोकल ट्रेनच्या डब्याचा आहे. वाशी गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी)चे पोलिस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्भे स्थानकाजवळ एका सीटवरून तीन महिला प्रवाशांमध्ये वाद झाला. यानंतर हाणामारी सुरू झाली आणि या भांडणात इतर महिलांनीही उडी घेतली, त्यानंतर हा वाद आणखी वाढला. मात्र, व्हिडिओमध्ये काही महिला सुरक्षितपणे त्यांच्या जागेच्या दिशेने धावताना दिसत आहेत.

भांडण वाढत असल्याचे पाहून नेरळमधील एक महिला पोलिस मध्यस्थी करण्यासाठी गेली असता तिलाही महिलांनी मारहाण केली. महिलांमध्ये झालेल्या या मारामारीत एका पोलिसासह तीन महिला जखमी झाल्या. व्हिडिओमध्ये दोन महिलांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे दिसत होते, त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले होते.

या घटनेचा तपास वाशी जीआरपी करत असून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे कटारे यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्भे स्थानकावर एका महिला प्रवाशाने सीट रिकामी असताना दुसऱ्या महिलेला सीट देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या तिसऱ्या महिलेनेही सीटवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. यावरून तीन महिलांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर हाणामारी झाली. यानंतर डब्यातील इतर महिलाही वादात सामील झाल्या.

हे ही वाचा:

बेंगळुरूमध्ये ओला, उबर, रॅपिडो ऑटो ठरवण्यात आल्या बेकायदेशीर; ३ दिवसात होणार सेवा बंद

Nobel Peace Prize 2022: नोबेल शांतता पुरस्काराची झाली घोषणा.. पहा कुणाला मिळाला या वर्षीचा नोबेल पुरस्कार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version