World Emoji Day 2023, जाणून घ्या इमोजीचा शोध कुणी लावला?

आज १७ जुलै रोजी जगभरात साजरा केला जाणारा हा 'वर्ल्ड इमोजी डे' (World Emoji Day) का साजरा केला जातो व इमोजीचा शोध कुणी आणि कसा लावला, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

World Emoji Day 2023, जाणून घ्या इमोजीचा शोध कुणी लावला?

आज १७ जुलै २०२३ ‘वर्ल्ड इमोजी डे’ आहे. सध्या आधुनिक युगात प्रत्येकजण सोशल मीडियाशी जोडला गेलेला आहे. सोशल मीडिया हा लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. सोशल मीडियाद्वारे आपण एकमेकांशी संवाद करू शकतो, हाच संवाद अनेकदा काहीही न लिहिता फक्त इमोजी पाठवूनही केला जातो. अनेकदा चॅट, पोस्ट किंवा कमेंट करताना सर्रास इमोजीचा वापर केला जातो. इमोजीमुळे आपण आपल्या मनातील भावना किंवा चेहऱ्यावरील हावभाव समोरच्यापर्यंत सहजरित्या पोहोचवू शकतो. त्यातच आज १७ जुलै रोजी जगभरात साजरा केला जाणारा हा ‘वर्ल्ड इमोजी डे’ (World Emoji Day) का साजरा केला जातो व इमोजीचा शोध कुणी आणि कसा लावला, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

तर दररोज वापरण्यात येणाऱ्या इमोजीचा शोध जपानमध्ये लागल्याचे सांगितले जाते. शिगेताका कुरिता (Shigetaka Kurita) यांनी सन १९९८ रोजी इमोजीचा शोध लावला. जगातील पहिला इमोजी त्यांनी एका टेलिकॉम कंपनीसाठी तयार केला होता. ९० च्या दशकाच्या शेवटी इमोजीचा शोध लागला. शिगेताका कुरिता एका एनटीटी डोकोमो (NTT Docomo) त्यावेळी टेलिकॉम कंपनीसाठी काम करत होते. मेसेजमध्ये आपली भावना अधिक चांगल्याप्रकारे मांडण्यासाठी त्यांनी फोटो ऐवजी कॅरेक्टर वापरण्याची संकल्पना मांडली, त्यातूनच इमोजीचा जन्म झाला.

इमोजीपीडिया या वेबसाईटने ‘इमोजी डे’ (Emoji Day) साजरा करण्याची संकल्पना सुरु केली. आपल्या आयुष्यामधील इमोजीचे महत्त्व पटवून देण्यासाठी इमोजीपीडिया (Emojipedia) ऑनलाइन वेबसाइटच्या संस्थापकांनी पहिल्यांदा इमोजी डे साजरा केला. २०१४ पासून ‘इमोजी डे’ (Emoji Day) साजरा केला जातो. इमोजीपीडिया ही एक युनिकोड मानक ऑनलाइन वेबसाइट आहे. ही वेबसाईट इमोजी आणि त्यांच्या डिझाइनची नोंदणी करते. इमोजीपीडियाचे (Emojipedia) संस्थापक जेरेमी बर्गे (Jeremy Burge) यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा ‘इमोजी डे’ (Emoji Day) साजरा करण्यास सुरुवात केली होती. २०१० मध्ये या इमोजींचा वापर भरपूर प्रमाणात वाढला आणि त्यानंतर ‘वर्ल्ड इमोजी डे’ (World Emoji Day) जगभरात साजरा करण्याची प्रथा चालू झाली.

हे ही वाचा:

शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटील म्हणाले…

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करु असा शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मानस

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मेंढपाळाचा अपघात, जागीच मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version