spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जागतिक आरोग्य संघटनेचा ७५ वा जागतिक आरोग्य दिन

जागतिक आरोग्य संघटनेने १९४८ साली जिनिव्हा येथे प्रथमच जागतिक आरोग्य सभा भरवली आणि १९५० साली जागतिक आरोग्य दिन प्रथमच जगभरात साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने १९५० मध्ये ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करावा असे घोषित केले. आणि म्हणूनच ७ एप्रिल हा दिवस कॅलेंडर (calendra) मध्ये नमूद केला गेला. आणि त्यानंतर आपण हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो.

जागतिक आरोग्य संघटनेने १९४८ साली जिनिव्हा येथे प्रथमच जागतिक आरोग्य सभा भरवली आणि १९५० साली जागतिक आरोग्य दिन प्रथमच जगभरात साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने १९५० मध्ये ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करावा असे घोषित केले. आणि म्हणूनच ७ एप्रिल हा दिवस कॅलेंडर (calendra) मध्ये नमूद केला गेला. आणि त्यानंतर आपण हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो.७ एप्रिल २०२३ रोजी जागतिक आरोग्य संघटना आपला ७५ वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. या ७५ वर्षांत जागतिक आरोग्य संघटनेने मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन साजरा करण्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे जागतिक आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित समस्यांवर विचार करणे हा आहे. जागतिक आरोग्य दिनाचे उद्दिष्ट संपूर्ण जगभरात समान आरोग्य सेवा सुविधांबद्दल जागरुकता पसरवणे आणि आरोग्याशी निगडित सर्व गैरसमज दूर करणे हा आहे. तसेच सरकारकडून आरोग्यविषयक धोरणे तयार करण्यास आणि त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यास सरकारला प्रवृत्त केले जाते. दरवर्षी यासाठी एक थीम निश्चित केली जाते, हि निश्चित केलेली थीम हि आरोग्यावर परिणाम करणाऱ्या वर्षाच्या आकडेवारीनुसार विशिष्ट विषयांवर आधारित असते. यंदाच्या आरोग्य दिनाची थीम परिचारिका आणि सुईणींचे योगदान आहे.

दरवर्षी यासाठी एक थीम निश्चित केली जाते, १९९५ मध्ये आरोग्या विषयक थीम ठरवल्यात आली. ती थीम म्हणजे जागतिक पोलिओ निर्मूलन.जगात पोलिओबद्दल जागरूकता पसरवून बहुतेक देश या प्राणघातक आजारापासून मुक्त झाला. ही संस्था आर्थिकदृष्ट्या मागास किंवा अपंग देशांमध्ये मोफत रुग्णालये आणि औषधांची व्यवस्था करते. जागतिक आरोग्य दिन म्हणजे फक्त आरोग्याशी संबंधित विचार न करता आरोग्यामध्ये केवळ शारीरिकरित्याच नाही तर मानसिकरित्याही तंदुरूस्त असणे हेही उद्देश आहे. एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असेल तर त्या व्यक्तीला निरोगी म्हटलं जातं. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार आरोग्य हे मानवी आनंद आणि कल्याणासाठी मूलभूत आहे. हे आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान देते, कारण निरोगी व्यक्ती अधिक काळ आयुष्य आनंदी जगू शकते असे म्हटलं आहे. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन (World Health Day) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी, जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार,आमदारांचा ९ एप्रिलला अयोध्या दौरा

वाढत्या वजनाला त्रासलेले आहात? उपाशीपोटी हे मॅजिक वॅाटर नक्की प्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss