Tuesday, July 2, 2024

Latest Posts

The Academy School, Pune (TAS) यांनी केली जागतिक आयआयएमयुएन परिषद आयोजित

"विविध चर्चा आणि वादविवादांच्या प्रदर्शनाद्वारे, विद्यार्थ्यांना एक व्यापक दृष्टीकोन निर्माण करण्यास तसेच एक जागरूक नागरिक होण्यास मदत होईल..."

द अकादमी स्कूलकडून विद्यार्थ्यांसाठी इंडिया इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स (IIMUN) ची एक प्रमुख परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये २०० हून अधिक प्रतिनिधिंनी उपस्थिती दर्शवली होती. हा तीन दिवसीय कार्यक्रम २१ जून ते २३ जून दरम्यान आयोजित करण्यात आला होता. मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने ही परिषद फार महत्वपूर्ण आहे. आज सर्वत्र श्रोता कमी आणि वक्तेच खूप आहेत. त्यामुळे एक उत्तम श्रोता कसा बानू शकतो त्यासंदर्भाचे मार्गदर्शन या कार्यक्रमात करण्यात आले होते.

अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांचा समावेश या परिषदेत केला गेला होता. यात विद्यार्थ्यांना उत्तम श्रोता होण्यासाठी काय कौशल्ये आवश्यक आहेत तसेच आपले उच्चार सुधारण्यासाठी काय करावे यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले. लेखक अक्षत गुप्ता आणि प्रख्यात पारुल विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. पवन द्विवेदी (Dr Pawan Dwivedi)यांची प्रमुख उपस्थिती होती. नवीन दृष्टीकोन प्रदान करण्यासाठी द अकादमी स्कूलच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. तसेच पुण्याच्या उपमहापौर सुनीता वाडेकर (Sunita Vadekar) आणि पुण्याचे पोलिस उपायुक्त (IPS) आर राजा हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

‘द हिडन हिंदू’ या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक अक्षत गुप्ता (Akshat Gupta) यांनी आपली संस्कृती आणि इतिहास यावर प्रभावी संभाषण केले. ‘मिथक’ आणि ‘सत्य’शास्त्र (मिथक आणि सत्यातून व्युत्पन्न) यातील फरक देखील त्यांनी स्पष्ट केला. डॉ.पवन द्विवेदी यांनी विद्यार्थी आणि उपस्थितांना आपल्या संस्कृतीमध्ये असणाऱ्या आनंदाचे महत्त्व आणि त्याची गरज याविषयी सांगितले. लोकप्रतिनिधी कायदा १९५१, इंडियन प्रीमियर लीग मेगा लिलाव, ड्रग्ज आणि गुन्ह्यावरील संयुक्त राष्ट्रांचे कार्यालय आणि रामायणाच्या संकट समितीवर लोकसभेतील चर्चा अशा अनेक विषयांवर कठोर चर्चा देखील या परिषदेत करण्यात आली.

विविध चर्चा आणि वादविवादांच्या प्रदर्शनाद्वारे, विद्यार्थ्यांना एक व्यापक दृष्टीकोन निर्माण करण्यास तसेच एक जागरूक नागरिक होण्यास मदत होईल. या परिषदेमुळे संधींची नवीन दारे उघडली. टास आणि विद्यार्थ्यांसाठी ही एक ऐतिहासिक संधी होती. तसेच विद्यार्थ्यांनी नवीन संधींचा सतत शोध घ्यावा,” असे टासच्या प्राचार्य इंदिरा रामचंद्रन (Indira Ramchandran) यांनी सांगितले.

आयआयएमयुएन परिषदेचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे सांगण्यात येतील.

  • तरुणांना वैयक्तिकरित्या जागतिक समस्या सोडवण्यासाठी सक्षम बनवणे.
  • द अकादमी स्कूल, पुणे ही एक आयसीएससी शाळा आहे, जी फिनलँडच्या शैक्षणिक अध्यापनशास्त्राचे अनुसरण करते
  • तसेच आधुनिक अध्यापनाद्वारे शिक्षणासोबतच अनेक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करते.

हे ही वाचा:

VIDHAN PARISHAD ELECTION : ज्येष्ठ नेत्यांनी PANKAJA MUNDE यांना दिला बुस्टर डोस ; अर्ज भारण्यापूर्वी माध्यमांशी साधला भावुक संवाद

जितेंद्र आव्हाड यांनी केला मोठा आरोप, वर्ल्ड कपच्या नावाखाली…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss