spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

World International Women’s Day निम्मित जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

८ मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस सर्वसाधारणपणे महिलांच्या कर्तुत्वासाठी आणि अस्तित्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

८ मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस सर्वसाधारणपणे महिलांच्या कर्तुत्वासाठी आणि अस्तित्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा जगभरात सार्वजनिक सुट्टी म्हणून पाळला जातो. सलून आणि शॉपिंग मॉलमध्ये (Shopping mall) महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमाचे अनावरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व सांगणार आहोत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास आणि महत्त्व –

२८ फेब्रुवारी १९९० रोजी अमेरिकेच्या सोशालिस्ट पार्टीने (Socialist Party) न्यूयॉर्कमध्ये राष्ट्रीय महिला दिनाची स्थापना केली होती. कामगार कार्यकर्त्या थेरेसा मल्कीएल (Theresa Malkiel) यांनी गारमेंट कामगाराच्या विरोधात शहरातील निषेध करण्यासाठी ही कल्पना मांडण्यात आली होती. अमेरिकेच्या समाजवादाकडून प्रेरणा घेऊन जर्मन प्रतिनिधींनी महिला दिनाची कल्पना मांडली होती. तरीही कोणतीही विशिष्ट तारीख निश्चित करण्यात आली नव्हती.

युनायटेड नेशनने १९७५ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आणि १९७७ मध्ये युवाने जनरल असेंबलीने ८ मार्च हा महिला हक्क आणि जागतिक शांततेच्या समर्थनासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित करण्यात आला होता. तेव्हापासून संयुक्त राष्ट्रांनी दरवर्षी हा दिवस जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे उद्दिष्ट महिलांच्या कर्तुत्वाचा उत्सव साजरा करणे आणि लैंगिक समानतेसाठी समर्थन करणे हे आहे. लैंगिक समानतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जेणेकरून आपल्या समाजातील सर्वात असुरक्षित सदस्यांना सर्व क्षेत्रात अधिकार मिळावेत. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रिया कलापणांमध्ये समान प्रोत्साहन द्यावे. असे या दिनाचे उद्दिष्ट आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी ! मनसे नेते संदीप देशपांडेवर मॉर्निंग वॉकवेळी हल्ला, जाणून घ्या हेल्थ अपडेट

Women’s Premier League, पहिला सलामी सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स

ठामपाच्यावतीने गरजू महिलांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना’ सुरू करावी शिवसेनेची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss