spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

World Ocean Day 2023: या कारणांमुळे जागतिक महासागर दिन साजरा केला जातो

पृथ्वीवरील ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे. पृथ्वीवरील हा भूभाग विविध जलस्रोतांनी व्यापला असून त्यातील जवळजवळ ९७ टक्के पाण्याचा साठा हा समुद्र, खड्या आणि महासागराच्या स्वरूपात आहे. आपल्या पृथ्वीवर एकूण पाच महासागर असून प्रशांत महासागर (Pacific ocean), अटलांटिक महासागर (Atlantic Ocean), हिंदी महासागर (Indian Ocean), आर्टिक महासागर (Arctic Ocean), अंटार्क्टिका महासागर ( Southern (Antarctic) Ocean) ही त्यांची नावे आहेत.

पृथ्वीवरील ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे. पृथ्वीवरील हा भूभाग विविध जलस्रोतांनी व्यापला असून त्यातील जवळजवळ ९७ टक्के पाण्याचा साठा हा समुद्र, खड्या आणि महासागराच्या स्वरूपात आहे. आपल्या पृथ्वीवर एकूण पाच महासागर असून प्रशांत महासागर (Pacific ocean), अटलांटिक महासागर (Atlantic Ocean), हिंदी महासागर (Indian Ocean), आर्टिक महासागर (Arctic Ocean), अंटार्क्टिका महासागर ( Southern (Antarctic) Ocean) ही त्यांची नावे आहेत. प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर असून जगातील सर्वात लहान महासागर आर्टिक महासागर आहे. महासागराला आपल्या ग्रहाचे फुफ्फुसे मानले जाते त्याचेकारण म्हणजे महासागर ग्रहाच्या ५०% टक्के ऑक्सिजन उत्पादनाचे काम करतो. महासागरावर आपली अर्थव्यवस्थेवर देखील अवलंबून असते. अश्या या महत्वपूर्ण महासागराचे प्रत्येकानेच संवर्धन केले पाहिजे.

जागतिक महासागर दिन हा ८ जून रोजी सर्वत्र साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे अनेक उद्देश आहेत. हा दिवस साजरा करून लोकांना मानवी जीवनात असलेल्या समुद्राच्या फायद्यांविषयी जनजागृती केली जाते. मानवी जीवनात महासागराचे काय महत्व आहे हे लोकांना पटवून देण्याचा महत्वाचा उद्देश हा दिन साजरा करण्यामागे आहे. या दिवशी लोकांना महासागराविषयी महत्वाच्या जबाबदार्यांबद्दल माहिती दिली जाते. महासागराचे संवर्धन करणे किती गरजेचे आहे याबद्दल लोकांना पटवून दिले जाते. महासागरात प्रदूषणाचे प्रमाण भरपूर वाढले आहे.

महासागरात होणारे वाढते प्रदूषण लक्षात घेताच या पार्श्वभूमीवर रिओ दि जानेरो येथे १९९२ साली प्लॅनेट अर्थ (Planet Earth) या नावाच्या कार्यक्रमात जागतिक महासागर दिन साजरा कार्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला २००८ साली संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे मान्यता दिली. युनेस्कोच्या वतीने असे सांगण्यात आले कि २००८ साली संयुक्त राष्टाने मानवी जीवनाचे समुद्रासोबत असलेले नाते साजरे करण्यासाठी ८ जून या दिवसाला जागतिक महासागर दिवस म्हणून मान्यता दिली. या दिवशी ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करून लोकांना महासागराविषयी जागृत केले जाते.

हे ही वाचा:

नवी मुंबईत घ्या Tirupati Balajiचं दर्शन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं मंदिराचं भूमिपूजन

WTC – भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दिली ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यू पावणाऱ्यांना श्रद्धांजली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss