World Photography Day 2023, तुम्हाला माहिती का ‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ साजरा करण्यामागचं कारण?

आपण आपल्या आयुष्यतील काही महत्वाचे क्षण कॅमेरामध्ये कैद करून ठेवतो. आपले असे काही फोटो जुन्या आठवणींना उजाळा देतात.

World Photography Day 2023, तुम्हाला माहिती का ‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ साजरा करण्यामागचं कारण?

आपण आपल्या आयुष्यतील काही महत्वाचे क्षण कॅमेरामध्ये कैद करून ठेवतो. आपले असे काही फोटो जुन्या आठवणींना उजाळा देतात. आज जागतिक फोटोग्राफी दिन (१९ ऑगस्ट) हा दिवस प्रत्येक फोटाग्राफरच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे जगभरातील सर्व फोटोग्राफर यांना उत्साहित आणि चांगले फोटो काढण्यासाठी प्रेरणा देणार दिवस आहे.फोटोचा माध्यमातून माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत प्रत्येकाचा भावना जपून ठेवल्या जातात. आज आपल्याकडे काही ऐतिहासिक फोटोची नोंदणी फोटोग्राफीमुळे शक्य झाले आहे.

दरवर्षी १९ ऑगस्ट हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. सध्याचा काळात फोटोग्राफी हा विषय सगळयांचा आवडीचा बनवला आहे. अगदी लहान मुलंपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच फोटो काढायला आवडतात. जागतिक फोटोग्राफी दिवसाची सुरवात २०१० पासून झाली. याच दिवशी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. १८३७ साली फ्रेंच तंत्रज्ञ Louis Daguerre आणि Joseph Nicephore Niepce यांनी Daguerreotype फोटोग्राफी प्रोसेस चा शोध लावला. त्यानंतर काही दिवसाने फ्रान्स सरकारने आविष्काराचे एक पेटंट विकत घेतेले.

 

१९ ऑगस्ट १९३९ रोजी फ्रान्स सरकार कडून याची घोषणा करण्यात आली . म्हणून हा दिवस जागतिक फोटोग्राफी (World photogrphy day) म्हणून साजरा केला जातो. १८३९ मध्ये विल्यम हेन्री फॉक्स टालाबॉट याने फोटो काढण्यास सुरवात केली. टालाबॉट यांनी कागदावर आधारित मीठ प्रिंट वापरून छायाचित्राचा प्रक्रियेचा शोध लावला. तसेच अमेरिकेचे फोटो प्रेमी रॉबर्ट कॉर्नेलियस यांनी पहिली सेल्फी क्लीक केली होती. त्यानंतर जगभरात सर्वंनी सेल्फी क्लीक करायला सुरवात केली. दरवर्षी (World photogrphy day) या दिवशी अनेक नव नवीन उपक्रम राबवले जातात.फोटोचा माध्यमातून सर्व परिस्थिती काहीही न बोलता सांगितली जाते. आज फोटोग्राफी हे कॅरियर म्हणून निवडत आहेत. आत्ताचा काळात फोटोग्राफी हा पर्याय उत्पादनाचे साधन झाले आहे.
जागतिक फोटोग्राफी दिन २०२३ ची लँड्सकॅप (Landscap) हि थिम ठेवण्यात आली आहे. या वर्षीचा थीम नुसार लँड्सकॅप चे सर्वत्कृष्ट फोटो worldphotographyday.com वर शेअर करा.

हे ही वाचा:

जळगावमधील आर एल ज्वेलर्सची सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी सुरु

राज्यात गणोशोत्सव, दिवाळीत 100 रुपयात आनंदाचा शिधा

ईस्त्रोची चांद्रयान-३ मोहिम अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version