spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

World Population Day 2024: जागतिक लोकसंख्या दिवस का साजरा करतात? जाणून घ्या महत्त्व

दरवर्षी ११ जुलै रोजी 'जागतिक लोकसंख्या दिवस' (World Populataion Day) जगभरात साजरा केला जातो. वाढत्या लोकसंख्येचे धोके आणि फायद्यांबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

दरवर्षी ११ जुलै रोजी ‘जागतिक लोकसंख्या दिवस’ (World Populataion Day) जगभरात साजरा केला जातो. वाढत्या लोकसंख्येचे धोके आणि फायद्यांबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रम आणि संदेशाद्वारे लोकांचे लक्ष वाढत्या लोकसंख्येकडे वेधले जाते. जागतिक लोकसंख्या आणि त्यात वाढ होण्याशी संबंधित समस्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि लोकांना माहिती देण्यासाठी दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करून नागरिकांना जागरूक केले जाते. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात कशी झाली, साजरा करण्यामागे उद्देश काय आहे आणि या वर्षीची थीम काय आहे ? हे थोडक्यात जाणून घेऊया.

संयुक्त राष्ट्र संघाने १९८९ साली ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा करण्याची घोषणा केली होती. १९८७ मध्ये या दिवशी जगाची लोकसंख्या ५ अब्जाच्या पुढे गेली, तेव्हा हा दिवस साजरा करण्याची कल्पना आली. हा दिवस साजरा करण्याची सूचना डॉ. के. सी. जकेरिया यांनी केली. जागतिक लोकसंख्या दिनाची स्थापना १९८९ मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमा द्वारे करण्यात आली. पहिला लोकसंख्या दिवस ११ जुलै १९९० रोजी साजरा करण्यात आला. सध्या जगाची लोकसंख्या ८ अब्जांपेक्षा जास्त आहे. हा दिवस वाढत्या लोकसंख्येचा विकास आणि पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकतो. लोकसंख्येच्या वाढीमुळे सकारात्मक परिणामांपेक्षा नकारात्मक परिणाम अधिक दिसत आहे. ज्याबद्दल लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दिवशी लोकांना लैगिक समानता, पुनरुत्पादक आरोग्य आणि कुटुंब नियोजनाबद्दल महत्त्व सांगितले आहे.

‘जागतिक लोकसंख्या दिन २०२४’ ची थीम ‘सर्वांची गणना’ ही आहे. ही थीम जगभरातील लोकांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी लोकसंख्या डाटा गोळा करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. जागतिक लोकसंख्या दिनाचा आणखी एक महत्वाचा उद्देश म्हणजे माता आरोग्य आणि नवजात शिशु आरोग्य सेवांचा दर्जा सुधारणे असा आहे. जागतिक लोकसंख्या दिन जागतिक लोकसंख्येशी संबंधित प्रचलित मुद्दे समोर आणण्यावर लक्ष केंद्रित करतो. जगातील महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांपासून ते आर्थिक संकटापासून ते दारिद्र्यापर्यंत, जागतिक लोकसंख्या दिन हा लोकांचे जीवन बदलण्यासाठी आणि त्यांना चांगले बनवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आठवण करून देतो.

Ashadhi Ekadashi 2024: जाणून घ्या आषाढी एकादशीचे महत्त्व, तिथी आणि शुभ मुहूर्त

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss