spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 2022: तारीख, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो

ऑगस्ट महिना म्हणजे विविध सणांचा महिना. पण, तुम्हाला माहितीये का की याच महिन्यात अनेक महत्त्वाचे दिवस देखील साजरे केले जातात. म्हणजेच जागतिक डास दिवस (World mosquito day), जागतिक स्तन कर्करोग संशोधन दिवस (World Breast Cancer research day), अक्षय ऊर्जा दिवस असे अनेक महत्त्वपूर्ण दिवसांनी हा महिना भरलाय. आणि याच महिन्यात येतो तो जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस (World Senior Citizen’s Day).

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. वृद्ध लोकांवर परिणाम करणाऱ्या समस्यांबद्दल जागरुकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. ज्येष्ठ नागरिकांचे कर्तृत्व, समर्पण आणि त्यांनी आयुष्यभर पार पाडलेल्या कर्तव्यांचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे. आपण त्यांच्या जीवनानुभवातून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण राहत असलेल्या जगाच्या उभारणीत त्यांचे योगदान ओळखले पाहिजे. हा दिवस तरुण पिढीला आणि शासनाला वृद्ध लोकांच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी वचनबद्ध होण्याची आठवण करून देतो. हा दिवस वृद्धांवर होणारा अत्याचार आणि वृद्धापकाळाशी संबंधित आरोग्य समस्या यासारख्या मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित करतो.

इतिहास

युनायटेड स्टेट्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी 19 ऑगस्ट 1988 रोजी एका घोषणेवर स्वाक्षरी केल्यावर या दिवसाची स्थापना करण्यात आली. 14 डिसेंबर 1990 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) 21 ऑगस्ट हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन (World Senior Citizen’s Day) म्हणून घोषित केला.

आपल्या अध्यक्षीय घोषणेमध्ये, रेगन म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या आयुष्यात बरेच काही मिळवले आहे आणि सामान्य लोकांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.

महत्त्व

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा आपल्याला आणि सरकारला ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाची आठवण करून देण्याचा एक उत्तम प्रसंग आहे. वृद्ध व्यक्तींची कोणत्याही प्रकारचा गैरसोय होऊ नये आणि त्यांच्यासाठी सरकारने सुरू केलेल्या सर्व कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ त्यांना मिळावा याचीही आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या सभोवतालच्या वृद्ध लोकांवर परिणाम करणाऱ्या सर्व सामाजिक आणि आर्थिक समस्यांकडे हा दिवस लक्ष वेधतो. त्यांचा जीवन प्रवास स्मरणात ठेवण्याचा आणि साजरा करण्याचा आणि समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे.

भारतातील ज्येष्ठ नागरिकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, जसे की रस्ते विसरणे,बिल भरण्यास उशीर होणे आणि जुन्या नातेवाइकांशी संपर्क न होणे. एक तरुणपिढी म्हणून आपल्यासाठी या गोष्टी मोबाइलच्या एका क्लिकवर उपलब्ध आहेत. पण, वृध्दांच काय? त्यांना या गोष्टी अजूनही कठीण वाटतच आहेत. म्हणून, समाजाच्या तरुण पिढीने त्यांना या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी, त्यांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी मदत केली पाहिजे आणि त्यांना एक उत्तम आणि आनंदी जीवन जगण्यास मदत केली पाहिजे.

हे ही वाचा:

राशी भविष्य 21 ऑगस्ट 2022

Latest Posts

Don't Miss