World Soil Day 2022 ‘जागतिक मृदा दिन’ ५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

World Soil Day 2022 ‘जागतिक मृदा दिन’ ५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

मृदा आपल्या दैनंदिन जीवनात अधिक महत्त्वाची आहे. आपल्याला मातीचे महत्त्व सांगण्यासाठी व मातीच्या गुणवत्तेची जाणीव करुन देण्यासाठी दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. आता प्रश्न असा आहे की माती वाचवण्याची गरज का आहे? वास्तविक, प्रदूषण आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे दरवर्षी मातीची गुणवत्ता कमी होत आहे. ही एक गंभीर समस्या आहे. मातीच्या ऱ्हासामुळे सेंद्रिय पदार्थांचे नुकसान होते आणि जमिनीची सुपीकता कमी होते. अशा परिस्थितीत लोकांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. जागतिक मृदा दिवस म्हणजेच जागतिक मृदा दिनाविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा : 

Share Market Opening Bell आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात ३०५ हून अधिक अंकांनी घसरण

जागतिक मृदा दिनाचा इतिहास

२००२ मध्ये, इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्स (IUSS) ने ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव दिला. जेणेकरुन लोकांना मातीच्या बिघडलेल्या स्थितीबद्दल जागरूक केले जाईल. यानंतर, जून २०१३ मध्ये, अन्न आणि कृषी संघटना (FAO) परिषदेने ६८ व्या संयुक्त राष्ट्र महासभेत जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा आग्रह केला. शेवटी असेंब्लीने ५ डिसेंबर २०१४ हा पहिला अधिकृत जागतिक मृदा दिवस म्हणून घोषित केला. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

मनसे नेते वसंत मोरेंना राष्ट्रवादीकडून ऑफर, अजित पवार म्हणाले तात्या कधी येता?

जागतिक मृदा दिन साजरा करण्याचा उद्देश

मातीचा ऱ्हास हा आपल्या परिसंस्थेला धोका आहे आणि जागतिक स्तरावर हा मोठा धोका मानला जात आहे. अशा परिस्थितीत ५ डिसेंबर हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश केवळ मातीशी संबंधित समस्या, त्यात येणारी आव्हाने इत्यादींबद्दल लोकांना जागरूक करणे आहे.

उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकरांची आज पुन्हा भेट होणार, युतीचा निर्णयावर शिक्कामोर्तब?

Exit mobile version