जगातील सर्वात वयस्कर पांडाने घेतला शेवटचा श्वास…

“ॲन ॲन हा थीम पार्कच्या कुटुंबाचा एक सदस्य होता”, असे पार्कच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचा विकास आणि उद्यानाचा विकास जवळजवळ एकाच वेळी सुरू झाला आणि दोघे एकत्र वाढले.

जगातील सर्वात वयस्कर पांडाने घेतला शेवटचा श्वास…

काळ्या – पांढऱ्या रंगाच्या आणि गुबगुबीत शरीर असणाऱ्या पांडाचे व्हिडिओ अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवते. पण, प्राणीप्रेमींना काहीशी दुःखी करणारी एक बातमी म्हणजे मानवी संरक्षणात जगणाऱ्या जगातील सर्वात वृद्ध पांडाच्या मृत्यूच्या बातमी. ॲन ॲन असे या पांडाचे नाव असून हॉंगकॉंग मधील १९९९ पासून ओशन थीम पार्कमध्ये हा पांडा राहत होता. वृद्धापकाळमुळे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे गुरुवारी या पांड्याला इच्छा मरण देण्यात आले.

गेल्या काही आठवड्यांपासून त्याची तब्येत सतत खालावत होती आणि त्याने आपले खाणे पिणे सोडून दिले होते. अखेर काही दिवसांनी त्याने आपले खाणे पिणे पूर्णपणे बंद केले. या ओशन थीम पार्कमध्ये सागरी प्राणी आणि संरक्षित प्राणी ठेवण्यात आले आहेत. उद्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी जिया जिया या नावाची मादी पांडा २०१६ मध्ये मरण पावली व तेव्हा तिचे वय 38 वर्षे इतके होते.

हे दोन्ही नर आणि मादी पांडा चीन सरकारने थीम पार्कला भेट म्हणून दिले होत. “ॲन ॲन हा थीम पार्कच्या कुटुंबाचा एक सदस्य होता”, असे पार्कच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचा विकास आणि उद्यानाचा विकास जवळजवळ एकाच वेळी सुरू झाला आणि दोघे एकत्र वाढले. या पांडाची स्थानिक लोकांशी आणि पर्यटकांशी चांगली मैत्री होती. अशाप्रकारे वयाच्या ३५ व्या वर्षी त्याचे निधन झाले जे मनुष्याच्या १०५ वर्षांच्या बरोबरीचे आहे.

सध्या या पार्कमध्ये चीनने २००७ साली या थीम पार्कला भेट दिलेले यिंग यिंग आणि ले ले असे आणखी दोन पांडा आहेत.

Exit mobile version