spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

YES BANK-DHFL प्रकरणी AVINASH BHOSALE यांना जामीन मंजूर

डीएचएफएल (DHFL) आणि YES BANK यांच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे अटकेत असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अविनाश भोसले यांना जमीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाखांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. अविनाश भोसले (AVINASH BHOSALE) यांना २६ मे २०२२ रोजी येस बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय (CBI) कडून अटक करण्यात आली होती. येस बँक आणि डीएचएफएल (DHFL) घोटाळ्याप्रकरणी ईडी, सीबीआयकडून यापूर्वी चौकशी करण्यात आली होती. २०१८ साली एप्रिल ते जून दरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यामधून दुसऱ्या खात्यात पाठवण्यात आले. वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला होता. सीबीआयच्या मतानुसार यामध्ये मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश होता. बांधकाम व्यावसायिक असणारे अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया, बलवा आणि गोएंका यांचा समावेश होता. ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची ४० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती.

अविनाश भोसले आहे तरी कोण?

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि रिअल इस्टेट किंग म्हणून ओळखले जाणारे अविनाश भोसले हे माजी राज्य मंत्री आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. सध्या बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही निशाणा साधल्याने मोठी खळबळ उडाली होती. कोट्यवधी रुपयांचा असणारा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.

नेमकं प्रकरण काय? 

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना २६ मे २०२२ रोजी अटक केली होती. येस बँकचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएल समूहाचे प्रवर्तक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्यासोबत डीएचएफएलला आर्थिक सहाय्य केले होते. येस बँकेने एप्रिल ते जून २०१८ या काळात डीएचएफएलमध्ये अल्प मुदतीच्या नॉन कन्वर्टेबल डिसेंबरमध्ये ३ हजार ९८३ कोटी गुंतवले. तसेच आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स या डीएचएफएलची समूह कंपनीला वांद्रे येथी प्रकल्पासाठी ७५० कोटींचे कर्ज मंजूर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. यात कपिल वाधवान याने डीएचएफएलच्या माध्यमातून राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना येस बँकेकडून कर्जाच्या नावाखाली ६०० कोटी रुपये दिले असल्याचा आरोप आहे. अविनाश भोसले यांना यासाठी २०२८ मध्ये सल्ला दिल्याची फी म्हणून ६८ कोटी रुपये मिळाले होते. ‘अव्हेन्यू ५४’ आणि ‘वन महालक्ष्मी’ हे दोन प्रकल्प बांधकाम व्यायसायिक संजय छाब्रिया यांनी विकसित केले आहेत. याशिवाय भोसलेंना वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही सल्ला दिल्याबद्दल शुल्क रक्कम मिळाली आहे. या प्रकल्पांचा खर्च, वास्तुविशारद आणि अभियांत्रिकी आराखडा करार, वित्तीय मूल्यांकन व संरचना यांबाबत भोसलेंच्या कंपन्यांकडून सल्ला देण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेकडे आहे.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss