Tuesday, July 2, 2024

Latest Posts

YOGA एक उत्तम करिअर; जाणून घेऊयात सविस्तर

"आजारांचे निदान करण्यासोबतच निरोगी राहण्यासाठी योगासनेही केली जात आहेत. त्यामुळे आता योग प्रशिक्षकांची मागणीही वाढली आहे. आता तरुण वर्ग योगाकडे उत्तम करिअर म्हणून पाहत आहे. सध्या शैक्षणिक संस्थांमध्ये योगाशी संबंधित अनेक प्रकारचे कोर्सेस चालू आहेत, ज्याद्वारे आपण चांगले करिअर करू शकतो"

योग (संस्कृत योगः) ही एक विशिष्ट आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी प्राचीन भारतीय ऋषी आणि तत्त्वज्ञांनी मांडली आहे. पतंजली यांनी मनाच्या अंतःप्रेरणेवर नियंत्रण ठेवणे’ याला योग म्हटले आहे. योगाचे अनेक भाग आणि प्रकार आहेत, ज्याद्वारे आपल्याला ध्यान, समाधी आणि मोक्षापर्यंत पोहोचायचे आहे. ‘योग’ हा शब्द आणि त्याची प्रक्रिया आणि संकल्पना हिंदू , जैन आणि बौद्ध धर्मातील ध्यान प्रक्रियेशी संबंधित आहेत . योग हा शब्द भारतातून बौद्ध धर्मासह चीन, जपान, तिबेट, दक्षिण पूर्व आशिया आणि श्रीलंका येथे पसरला आहे आणि सध्या संपूर्ण सुसंस्कृत जगामध्ये लोक त्याच्याशी परिचित आहेत. सिद्धीनंतर, ११ डिसेंबर २०१४ रोजी प्रथमच, संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून ओळखला.पाश्चात्य जगात, “योग” हा हठयोगाचा आधुनिक प्रकार म्हणून घेतला जातो. ज्यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती, ताण-तणाव कमी करणे आणि विश्रांतीची तंत्रे प्रामुख्याने असतात. ही तंत्रे प्रामुख्याने आसनांवर आधारित आहेत तर पारंपारिक योग ध्यानावर केंद्रित आहे आणि सांसारिक आसक्तीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. पाश्चात्य जगामध्ये स्वामी विवेकानंदांच्या प्रसिद्धीनंतर भारतातून त्या देशांत गेलेल्या गुरूंनी आधुनिक योगाचा प्रसार पाश्चिमात्य जगात केला.

सध्या जगभरात योग किंवा योगासनांची (yoga) क्रेझ खूप वाढताना दिसत आहे. २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीदरम्यान ठेवला होता. तो मान्यही झाला. त्याच पार्श्वभूमीवर २०१५ सालापासून, दरवर्षी  २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) साजरा केला जातो. सध्या ज्या वेगाने योगाचा विस्तार होत आहे, ते पाहता येत्या काळात या क्षेत्रातील नोकऱ्यांची मागणीही बरीच वाढत असल्याचे दिसून येत आहे.

जर तुम्हालाही योगामध्ये रस असेल आणि या क्षेत्रात करिअर करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी देश-विदेशात करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. योग हे असे माध्यम आहे, ज्यामुळे जगभरातील लाखो लोकं हे नैसर्गिकरित्या निरोगी झाले आहेत. अनेकांना योगाची मदत झाली आहे. यामुळे आजच्या घडीला मोठमोठ्या संस्थांमध्ये योग शिक्षकांना मोठी मागणी मिळताना दिसत आहे. योग क्षेत्रातील अभ्यासक्रम काय आहे, आणि त्या क्षेत्रात नोकरीची किती व कशी संधी आहे, हे आजच्या लेखातून जाणून घेऊया.
“आजारांचे निदान करण्यासोबतच निरोगी राहण्यासाठी योगासनेही केली जात आहेत. त्यामुळे आता योग प्रशिक्षकांची मागणीही वाढली आहे. आता तरुण वर्ग योगाकडे उत्तम करिअर म्हणून पाहत आहे. सध्या शैक्षणिक संस्थांमध्ये योगाशी संबंधित अनेक प्रकारचे कोर्सेस चालू आहेत, ज्याद्वारे आपण चांगले करिअर करू शकतो” असे योगाभ्यास करणाऱ्या लीनल देशमुख यांचे म्हणणे आहे. पैसे कमावण्यासाठी आपण शरीराची काळजी घेत नाही, असे ते म्हणाले. तर औषधांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा आरोग्यामध्ये गुंतवणूक करणे अधिक चांगले आहे.
योगाच्या माध्यमातून आपण आपले करिअर नक्की घडू शकतो. त्यासाठी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. साधारणतः १२ वी उत्तीर्ण झाल्यावर आपण योगाकडे करिअर म्हणून सुद्धा पाहू शकतो.मोठ्या शैक्षणिक संस्थांमधून अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि अनेक डिप्लोमा प्रोग्रामदेखील आखण्यात येतात. याशिवाय सर्टिफिकेट कोर्सदेखील उपलब्ध आहेत. 12 वी उत्तीर्ण असाल तर UG कोर्ससाठीदेखील तुम्ही अर्ज करू शकता. तसंच अनेक डिप्लोमा कोर्सदेखील उपलब्ध आहेत. BABSc in Yoga हा कोर्स 12वी नंतर करता येतो. यानंतर योगात MA करू. हा अभ्यासक्रम अनेक प्रसिद्ध योगा क्लासमध्ये घेण्यात येतो. यानंतर स्वत:चा स्टुडिओ उघडून योगाभ्यास करता येईल. यासोबतच होम क्लासेस, हॉस्पिटल्स, कॅम्प्स, संस्थांमध्येही नोकरी करता येते.

विविध संस्थांमधून कोर्स पूर्ण केल्यानंतर योग ट्रेनरच्या नोकरीसाठी अर्ज करू शकता. योग प्रशिक्षक, जिममध्ये योगा ट्रेनर, तसंच अनेक वेलनेस सेंटरमध्येही तुम्हाला अर्ज करता येतो. याशिवाय अनेक रूग्णालयांमध्येही सध्या योग प्रशिक्षकांसाठी मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य केंद्र, कॉर्पोरेट्स यामध्येही योग प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येते. याशिवाय निसर्गोपराक केंद्रात तुम्हाला योगा टीचर अथवा प्रशिक्षक म्हणून नोकरी मिळेल अथवा योग थेरपिस्ट म्हणूनदेखील तुम्हाला नोकरी मिळू शकते. याशिवाय अनेक विद्यापिठांमध्येही योग हा विषय अनिवार्य म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ योग अँड नेचरोपॅथी, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली राजर्षि टंडन ओपन विश्वविद्यालय, उत्तर प्रदेश देव संस्कृति युनिव्हर्सिटी, हरिद्वार, उत्तराखंड यूनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान वर्धमान महावीर ओपन यूनिव्हर्सिटी, राजस्थान श्री लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्ली बिहार योग विद्यालय तसंच ठिकठिकाणी विविध लहानलहान संस्था आहेत, जिथून तुम्हाला योग कोर्स करता येऊ शकतो. आयुष मंत्रालयाचा YCB चादेखील एक कोर्स असून हा २ महिन्यात करता येतो. त्यांसारखया अनेक संस्था आहेत ज्या तुम्हाला योगा या विषयात प्राविण्य मिळवून देण्यासाठी उयुक्त ठरतील.

हे ही वाचा

NTA कृत UGC-NET परीक्षा रद्द ; केंद्रसरकारच्या शिक्षण मंत्रालयाने दिल स्पष्टीकरण ..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss