spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Youtuber Armaan Malik युट्युबर अरमान मलिकच्या दोन बायका एकाच वेळी गरोदर, बेबी बंपचा फोटो शेअर करत केला खुलासा

हैदराबादचा प्रसिद्ध YouTuber अरमान मलिक (Armaan Malik) सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. नुकतेच त्याने आपल्या दोन्ही पत्नींसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोद्वारे आपण वडील बनणार असलायची माहिती दिली आहे. अरमानने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याच्या दोन्ही बायका प्रेग्नंट आहेत आणि बेबी बंप लावताना दिसत आहेत. अरमानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करताना लिहिले, “माझे कुटुंब” या फोटोंमध्ये अरमानसोबत त्याच्या दोन्ही पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिक सारख्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. फोटोंमध्ये दोघी गरोदर आहेत आणि बेबी बंप दाखवताना पोज देत आहेत. मात्र, आता या फोटोंसाठी अरमान मलिकला ट्रोल केले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

हेही वाचा : 

७५,००० कोटी रुपयांचे ‘ग्रीन एक्स्प्रेस हायवे’ पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली होणार तयार, नितीन गडकरींची नवी घोषणा

अरमान मलिक ट्रोल होत आहे

अरमानची पोस्ट समोर आल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण अरमानचे अभिनंदन करत आहेत, तर दोन्ही बायका गरोदर असताना अनेक जण त्याला ट्रोल करत आहेत. अरमानच्या दोन्ही बायका एकत्र प्रेग्नंट कशा असू शकतात याचा अनेकांना धक्का बसला आहे. लोक अरमानची चेष्टा करत आहेत आणि त्याला खोटे बोलत आहेत. एका युजरने आश्चर्याने विचारले – दोघी एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत का? दुसर्‍या यूजरने लिहिले – मला आश्चर्य वाटते… दोघी एकत्र प्रेग्नंट कसे असू शकतात. असे अनेकांनी म्हटले आहे.

कोण आहे अरमान मलिक?

अरमान मलिक एक लोकप्रिय YouTuber आहे, तो अनेकदा YouTube आणि Instagram वर मनोरंजक व्हिडिओ शेअर करतो. रिपोर्ट्सनुसार, अरमानने २०११ मध्ये पायलसोबत लग्न केले होते. यानंतर, २०१८ मध्ये, त्याने पत्नीची सर्वात चांगली मैत्रीण कृतिकासोबत लग्न केले. अरमान दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ दोघांसोबत शेअर करतो.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजे नागपूर ते शिर्डी ५२० किमीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

Latest Posts

Don't Miss