झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य ठरले देशातील सर्वात तरुण श्रीमंत व्यक्ती

तसेच, ते देशातील पहिला किशोरवयीन आहेत, ज्यांच्याकडे १,००० कोटींहून अधिक संपत्ती आहे.

झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य ठरले देशातील सर्वात तरुण श्रीमंत व्यक्ती

या जगात काही लोक त्यांच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे लहान वयातच यशाची उंची गाठतात. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे झेप्टोचे संस्थापक कैवल्य वोहरा. क्विक-कॉमर्स कंपनी झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य वोहरा देशातील सर्वात श्रीमंत तरुण बनले आहेत.

कैवल्य वोहरा यांनी यावर्षी प्रथमच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या IIFL वेल्थ हुरून २०२२ च्या यादीत स्थान मिळवले आहे. वोहरा व्यतिरिक्त, फिजिक्सवालाचे सह-संस्थापक अलख पांडे यांच्यासह इतर अनेक स्टार्ट-अप संस्थापक देखील प्रथमच या यादीत सामील झाले आहेत.

वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी वोहरा बनले देशातील सर्वात श्रीमंत तरुण

वोहरा वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत तरुण भारतीय बनले आहेत. तसेच, ते देशातील पहिला किशोरवयीन आहेत, ज्यांच्याकडे १,००० कोटींहून अधिक संपत्ती आहे. IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२२ नुसार, कैवल्य वोहरा यांनी २०२० मध्ये आदिती पालीचासोबत झेप्टोची स्थापना केली. गेल्या एका वर्षात त्याचे मूल्यांकन ५० टक्क्यांहून अधिक वाढले आहे. याचा थेट फायदा कैवल्य वोहरा यांना झाला आहे. त्याच वेळी, वोहरा व्यतिरिक्त, 20 वर्षीय आदिती पालीचाने देखील या यादीत स्थान मिळवले आहे. अहवालात असेही म्हटले आहे की १० वर्षांपूर्वी ‘श्रीमंतांच्या यादी’मध्ये देशातील सर्वात तरुण श्रीमंत ३७ वर्षांचा होता.

फिजिक्सवालाचे सह-संस्थापक अलख पांडेंनीही मिळवले यादीत स्थान

युनिकॉर्न फिजिक्सवालाचे सह-संस्थापक अलख पांडे (३० वर्षे) आणि प्रतीक माहेश्वरी (Pratik Maheshwari) यांनीही या यादीत पहिल्यांदा स्थान मिळवले आहे. . अहवालानुसार, पांडे आणि माहेश्वरी या दोघांची वैयक्तिक संपत्ती ४,००० कोटी रुपये आहे आणि ते सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 399 व्या क्रमांकावर आहेत. फिजिक्सवाला ही एक एडटेक कंपनी आहे जी अलख आणि माहेश्वरी यांनी कोरोना महामारीच्या काळात स्थापन केली होती. कंपनीने जूनमध्ये प्रथमच $१०० दशलक्ष निधीची फेरी पूर्ण केली आणि या कालावधीत तिचे मूल्य $१.१ अब्ज इतके होते.

२०२२ मध्ये ६२ टक्क्यांनी वाढली श्रीमंत लोकांची संख्या

२०२२ मध्ये प्रथमच १,००० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक वैयक्तिक संपत्ती असलेल्या भारतीयांची संख्या १,१०० पेक्षा जास्त झाली आहे. २०२१ च्या तुलनेत यंदा ही संख्या ९६ टक्के अधिक आहे. गेल्या पाच वर्षांत ही संख्या ६२ टक्क्यांनी वाढली आहे.

नायकाच्या फाल्गुनी नायरने किरण मुझुमदार-शॉच्या मागे टाकले आणि वेदांत फॅशन्सचे रवी मोदी देखील या यादीत प्रथमच सामील झाले, ज्यांच्या कंपन्यांची नुकतीच शेअर बाजारात नोंद झाली आहे. फाल्गुनी नायरने बायोकॉनच्या किरण मुझुमदार-शॉ यांना मागे टाकून यादीत सर्वात श्रीमंत स्वनिर्मित महिला म्हणून बाजी मारली आहे.

अदनींनी पटकावले अव्वल स्थान

अदानी यांनी भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या IIFL वेल्थ हुरून २०२२ च्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) चेअरमन मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यादीनुसार, गौतम अदानी हे १०.९४ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

हे ही वाचा:

राजकारणातील हिंदुत्वाचा अर्थ सांगणारा चित्रपट ‘हिंदुत्व’चा ट्रेलर प्रदर्शित

Amazon great Indian Festival 2022: २३ सप्टेंबरपासून सुरू होणार अमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल, जाणून घ्या मोबाइल एक्सचेंज ऑफर आणि बरंच काही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version