जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या लष्करी कुत्र्याने ‘झूमने’ घेतला जगाचा निरोप

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागमध्ये सोमवारी (१० ऑक्टोबर) सकाळी लष्कराच्या अ‍ॅसॉल्ट डॉग झूमच्या मदतीने दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले.

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या लष्करी कुत्र्याने ‘झूमने’ घेतला जगाचा निरोप

आर्मी अॅसॉल्ट डॉग झूमचा गुरुवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता मृत्यू झाला. त्याच्यावर लष्कराच्या ५४ एएफव्हीएच रुग्णालयात उपचार सुरू होते. झूमची स्थिती सुधारत असून चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले होते. सकाळी ११.४५ वाजेपर्यंत तो बरा दिसत होता, पण अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागमध्ये सोमवारी (१० ऑक्टोबर) सकाळी लष्कराच्या अ‍ॅसॉल्ट डॉग झूमच्या मदतीने दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. या चकमकीदरम्यान झूमलाही दोन गोळ्या लागल्या. त्यांच्यावर श्रीनगर येथील लष्कराच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.

झूम जखमी झाल्यानंतर, लष्कराने सांगितले की, “गोळ्या लागूनही, झूमने आपले काम सुरू ठेवले, परिणामी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले.” जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमधील कोकरनाग भागात सुरक्षा दलाच्या पथकाने ऑपरेशन राबवले.

असॉल्ट डॉग झूम या टीमचा भाग होता. ज्या घरात दहशतवादी लपले होते त्या घरात जाऊन दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम झूमला देण्यात आले होते. झूमने घरात जाऊन दहशतवाद्यांवर हल्ला केला. यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतरही झूम दहशतवाद्यांशी लढत राहिला.

सुरक्षा दलांशी झालेल्या या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी मारले गेले. या चकमकीत झूम व्यतिरिक्त दोन जवानही जखमी झाले आहेत. अडीच वर्षांचा झूम गेल्या १० महिन्यांपासून लष्कराच्या १५ कॉर्प्स असॉल्ट युनिटशी संबंधित होता.

हे ही वाचा:

MSRTC Bus for Diwali 2022: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीसाठी परिवहन महामंडळ सोडणार १५०० जादा गाड्या

Pooja Hegde birthday : ‘किसी का भाई किसी की जान’च्या सेटवर पूजा हेगडेच्या बर्थडेचं जोरदार सिलेब्रेशन, पहा हा व्हिडिओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version