आषाढी एकादशीनिमित्त प्रेक्षकांसाठी पर्वणी; गाजणार हरिनामाचा ‘डंका’

गेल्या काही दिवसांपासून 'डंका' (Danka) या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला आहे.

आषाढी एकादशीनिमित्त प्रेक्षकांसाठी पर्वणी; गाजणार हरिनामाचा ‘डंका’

गेल्या काही दिवसांपासून ‘डंका’ (Danka) या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला आहे. पंढरीच्या वारीत वारकरी पांडुरंगाचे नाव घेत मोठ्या श्रद्धेने चालतात, त्या प्रवासातच त्यांना पांडुरंग भेटत असावा. अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) हा मात्र या विठूरायाचा शोध घेतोय. हा शोध तो कशासाठी घेतोय? हे जाणून घ्यायचं असेल तर रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका…हरीनामाचा’ हा चित्रपट तुम्हाला पहावा लागेल. हा मराठी चित्रपट १९ जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव (Shreyas Jadhav) यांनी केले आहे.

या चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला असून, ‘चला आपण आणू आपल्या विठुरायाला’… असं अनिकेत बोलताना दिसतोय. विठ्ठलाच्या शोधात असतांना अनिकेतच्या हाती काय येतं? आणि हा शोध नेमका कुठे संपतो ? याची उत्सुकता प्रदर्शित झालेल्या टीझर वरून निर्माण झाली आहे. अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे (Sayaji Shinde), प्रियदर्शन जाधव (Priydarshan Jadhav), अविनाश नारकर (Avinash Narkar), किरण गायकवाड (Kiran Gaikwad), रसिका सुनील (Rasika Sunil), अक्षया गुरव (Akshaya Gueav), निखिल चव्हाण (Nikhil Chavhan), मयूर पवार (Mayur Pawar), किरण भालेराव (Kiran Bhalerao), कबीर दुहान सिंग (Kabir Duhan Sing), महेश जाधव (Mahesh Jadhav) या कलाकारांची झलकसुद्धा या टीझरमध्ये पहायला मिळतेय. ‘डंका ….हरिनामाचा’ चित्रपट हा मराठी भाषेतच नव्हे तर हिंदी, तेलगू, तामिळ, आणि कन्नड भाषेतसुद्धा प्रदर्शित होणार आहे.

‘डंका…हरीनामाचा’ हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अनिकेत सांगतो, या चित्रपटात मी ‘जना’ ही व्यक्तिरेखा साकारतोय. भक्तीत लीन होणारा, श्रद्धाळू, बापासाठी अगदी श्रावणबाळ असलेला ‘जना’ परंपरागत विठ्ठल मंदिर वाचवण्याचा प्रश्न येतो, तेव्हा तो आपलं सर्वस्व पणाला लावतो. या चित्रपटाच्या निमित्ताने खूप सुंदर अनुभव मला घेता आला. उत्तम दिग्दर्शक, सहकलाकार आणि निर्मिती संस्थेसोबत काम करण्याचा आनंद नक्कीच आहे. १९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. निर्माता रविंद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठूरायाला भक्तीभावाने समर्पित केला आहे. कार्यकारी निर्माते ऋषिकेश आव्हाड (Hrishikesh Awhad) आहेत. अमोल कागणे फिल्म्स, फिल्मास्त्र स्टुडिओजच्या वतीने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओज, अमेय खोपकर (Amey Khopkar), अमोल कागणे (Amol Kagane), प्रणीत वायकर (Praneet Vaykar) यांनी सांभाळली आहे.

हे ही वाचा

शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, Vinayak Raut यांचा Narayan Rane यांना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version