spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अमृता फडणवीसांची चाहत्यांना भेट, प्रजासत्ताक दिनानिमित्त लाँच केले नवे गाणे

आगामी 'भारतीयन्स' या चित्रपटातील देशभक्तीपर गाण्याला अमृता फडणवीस यांनी आपला आवाज दिला आहे. ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ असे या गाण्याचे बोल आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्या लाँच करत असलेल्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. असेच आजच्या दिवसाचे म्हणजेच प्रजसत्ताक दिनाचे औचित्य साधून एक नवे गाणे ते त्यांच्या चाहत्यांसासाठी घेऊन आल्या आहेत. आगामी ‘भारतीयन्स’ या चित्रपटातील देशभक्तीपर गाण्याला अमृता फडणवीस यांनी आपला आवाज दिला आहे. ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ असे या गाण्याचे बोल आहेत. प्रजासत्ताक दिनी हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. गाणे रिलीज होताच चाहत्यांकडून गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे आणि तसेच गाण्याच्या या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

बॉलिवूड चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ‘भारतीयन्स’ या चित्रपटाचा टिझर लाँच केला होता. दीन राज यांनी ‘भारतीयन्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ते दक्षिणेतील प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांना प्रभास स्टारर ‘ईश्वर’ या चित्रपटासाठी ओळखले जाते. याशिवाय त्यांनी ‘प्रेमिंचुकुंडम रा’ आणि ‘प्रेमंते इदेरा’ सारख्या टॉलिवूड चित्रपटांसाठी कथा लिहिली आहे. या चित्रपटातून ते आता बॉलिवूडमध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. ‘भारतीयन्स’ची कथा भारतातील विविध प्रदेशांतील सहा तरुणांच्या एका ग्रुपभोवती फिरते.

तसेच अलीकडच्या काळात अमृता फडणवीस यांचे ‘आज मै मूड बना लेया’ हे पंजाबी गाणे चाहत्यांच्या भेटीला आले होते. ६ जानेवारी रोजी हे गाणे रिलीज करण्यात आले होते. तसेच चाहत्यांच्या पसंतीमुळे हे गाणे सोशल मीडियावर देखील ट्रेंड झाले होते. रिलीज होताच गाण्याला २.३ कोटी व्ह्यूज मिळाले होते. याआधी अमृता फडणवीस यांच्या ‘वो तेरे प्यार का गम’ या गाण्याला दोन मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हे ही वाचा:’

टी-२० मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का, दुखापतीमुळे रुतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर

गांधी गोडसे एक युद्ध चित्रपटाच्या वादात ए आर रहमानची उडी, दिग्दर्शक राजकुमार संतोषींची बाजू घेत म्हणाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss