Andheri By-Election 2022 : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध, भाजपने घेतली माघार

Andheri By-Election 2022 : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध, भाजपने घेतली माघार

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार मागे घेणार का याकडे सर्वांचे लक्ष असताच या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत भाजपने अखेर माघार घेतली असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या उमेदवारी अर्ज मागे घ्या असे आवाहन देखील केले होते त्याचबरोबर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत भाजपने ही निवडणूक बिनविरोध लढवावी असे सूचित देखील केले होते.

त्याआधी रविवारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आशिष शेलार आणि मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्यासाठी ठाम होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यानंतर आज भाजपकडून आज झालेल्या बैठकीत माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुरजी पटेल आहेत कुठं?

समोर आलेल्या माहितीनुसार, मुरजी पटेल हे सध्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे त्यांचेही लक्ष लागले होते. मुरजी पटेल यांच्याकडून पोटनिवडणुकीसाठी मोठी तयारी करण्यात आली होती. स्थानिक पातळीवर त्यांनी याआधीच भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती मात्र आता. भाजपने माघार घेतल्याच्या निर्णयामुळे त्यांना मोठा धक्का असणार आहे.

 

Exit mobile version