spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दिल्ली पुन्हा भूकंप – ३.१ रिश्टर स्केलच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

दिल्ली एनसीआर पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. दिल्ली, गाझियाबाद आणि नोएडाच्या परिसरात आज भूकंपाचे धक्के जाणवले.

दिल्ली एनसीआर पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. दिल्ली, गाझियाबाद आणि नोएडाच्या परिसरात आज भूकंपाचे धक्के जाणवले. मागील दोन आठवड्यात दिल्लीला दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हे भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घाबरले आणि घराबाहेर पळाले

 दिल्लीमध्ये गेल्या दोन आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येतंय


दिल्लीमध्ये ३.१ रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये जाणवलेल्या या भूकंपाचे केंद्रबिंदू हरियाणातील फरीदाबादमध्ये असल्याची माहिती आहे.

रविवारी दुपारी ४ वाजून ८ मिनिटांनी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीआरमधील फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गुरुग्राममध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. सध्यातरी या भूकंपामध्ये कोणतीही हानी झाल्याची माहिती नाही.

 

Latest Posts

Don't Miss