spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘देवेंद्रजी और में हू साथ साथ, मेरा नाव है एकनाथ’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्या सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट जनतेतून सरपंच निवडीचे आणि नगराध्यक्ष निवडीचे विधेयक मांडले आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्या सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट जनतेतून सरपंच निवडीचे आणि नगराध्यक्ष निवडीचे विधेयक मांडले आहे. नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड ही थेट जनतेतून करावी अशी मागणी जनतेचीच होती, तो आमचा अजेंडा नसल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेत विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाचे कामकाज आज सुरू होते. या दरम्यान महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत औद्योगिक नगरी पंचायत विधेयक २०२२ संमत करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. ते विधेयक बहुमताने मंजूर केलं.

सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी, मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून करा अशी मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, घटनेच्या तरतुदीनुसार आपण नगराध्यक्षाची निवड करत असतो आणि त्यासंदर्भातील अधिकार राज्याला दिले आहेत. त्यामुळे आपण यामध्ये बदल करू शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून करता, मग मुख्यमंत्र्यांचीही निवड जनतेतून करा असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “थेट नगराध्यक्ष करावा असा निर्णय २००६ साली घेतला. असे निर्णय आताच आपण बदलला असे नाही. नगरविकास मंत्र्याने निर्णय घेतला, तो एका मंत्र्यांचा निर्णय नसतो तो सर्व मंत्र्यांचा असतो. एखादा गुंड एखाद्या वार्डात पैशाच्या जीवावर निवडून येऊ शकतो, पण पूर्ण शहरात पैशाच्या जीवावर तो निवडून येऊ शकत नाही. मग यावर मुख्यमंत्री जनतेतून निवडा अशी मागणी विरोधकांनी केली. मुख्यमंत्र्यांची जनतेतून निवड कसी करायची, मग घटनेत बदल करायचा का? आमचं सरकार घटनेनुसारच काम करतंय.”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, सरपंचांची निवड ही थेट जनतेतून करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने केली होती. ती मागणी आम्ही मान्य केली. आम्ही जनतेच्या मागण्यांवर काम करतोय, आम्ही आमचा अजेंडा राबवत नाही. जनतेच्या इच्छेनुसार आम्ही काम करतोय.” “जे काही झालं ते का झालं? हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यावर मी जास्त बोलणार नाही. जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो तेव्हा अनुभवामुळेच बदलला जातो. अजित दादाही म्हणाले होते की, जनतेतून नगराध्यक्षांची निवड करण्यात यावी.” असं मुख्यमंत्री विधानसभेत बोलताना म्हणाले आहेत. दादा ते तुमचं ऐकत होते म्हणून ते आमचं ऐकत नव्हते असं सांगत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. ‘देवेंद्रजी और में हू साथ साथ, मेरा नाव है एकनाथ’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

 

हे ही वाचा :-

भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या आयएसच्या बॉम्बरला रशियाने घेतले ताब्यात

“शिवसेनेशी युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील”, बाळा नांदगावकरांचे वक्तव्य

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss