spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नाशिकमध्ये भूकंप! एका तासात ३ वेळा भूकंप

अहवालानुसार रात्री 8.58, 9.34 आणि 9.42 असे तीन वेळा भुकंपाचे धक्के

नाशिक जिल्ह्यातील जांबुटके गावात जमिनीतून स्फोटकांसारखा आवाज झाला आणि दिंडोरी तालुक्यात भुकंपाचे (Nashik Earthquake) धक्के जाणवले आहेत. ,यानंतर स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती. प्रशानकाडून मात्र घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आलं.

मेरी येथील भूकंप मापक यंत्राच्या अहवालानुसार रात्री 8.58, 9.34 आणि 9.42 असे तीन वेळा भुकंपाचे धक्के जाणवले. या तीन भुकंपाची तीव्रता अनुक्रमे 3.4, 2.1 आणि 1.9 एवढी होती. भुकंपाचं केंद्र नाशिक वेधशाळेपासून 16 ते 20 किमी अंतरावर दिंडोरी तालुक्यामध्ये असण्याची शक्यता आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने दिली आहे. या भुकंपामध्ये अजूनपर्यंत कोणतीही हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

हे ही वाचा:

ऑस्कर अवॉर्ड्समध्ये RRR च्या दाव्यावर अनुराग कश्यपचे मोठे विधान

Latest Posts

Don't Miss