दिवाळीत श्वसनाचे आजार टाळण्यासाठी करा हे उपाय…

दिवाळीत श्वसनाचे आजार टाळण्यासाठी करा हे उपाय…

दिवाळी हा सण सर्वांना आवडतो. दिवाळी म्हटले की आपण खूप उत्साहात साजरी करतो. आणि त्याच उत्साहात आपण दिवाळीत फटाके फोडतो. पण त्याच फटाकेमुळे भरपूर प्रमाणात प्रदूषण होते. आणि प्रदूषण झाल्यास हवा प्रदूषित होते. या प्रदूषणामुळे आपल्याला अनेक आजरांना सामोरे जावे लागते. तसेच या प्रदूषणामुळे आपल्याला श्वसनाचे आजार देखील होतात. श्वसनाचे आजार झाल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारे इन्फेक्शन होते. हे इन्फेक्शन टाळण्यासाठी आम्ही काही उपाय सांगणार आहोत.

हे ही वाचा : winter season : हिवाळ्यात घ्या ‘अशी’ काळजी

 

दिवाळीत फटाके फोडताना कमी प्रमाणात फोडावे. कारण ही हवा फुफ्फुसाद्वारे आत जाते आणि श्वसनाचे आजार होण्यास कमी वेळ लागत नाही. त्यासाठी प्रदूषणा पासून दूर राहण्यासाठी घरच्या बाहेर पडताना मास्क घालणे, किंवा नाकावाटे रुमाल बांधणे, या वस्तूंचा वापर करणे. हे वायू प्रदूषण टाळण्यासाठी, तुम्ही स्वतःला तुम्ही शरीराच्या आतूनही सुरक्षित केले पाहिजे.

लिंबू, संत्री यांसारखी व्हिटॅमिन सी फळे सेवन करणे. ही फळे फुफ्फुस स्वच्छ करण्यास मदत करते. तसेच लिंबू आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त फळ आहे. म्हणूनच लिंबू आणि या फळाचा आहारात समावेश करावा.

आले तुमच्या घशासाठी खूप चांगले आहे. मध आणि आल्याचा रस सेवन केल्याने घसा खवखवणे आणि सर्दी या सारख्या समस्या कमी होतात. आल्याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात समावेश केल्याने आरोग्य निरोगी राहील.

गूळ आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहे. रात्री झोपण्यापूर्वी गुळाचा तुकडा आणि कोमट पाणीचे सेवन करणे. सेवन केल्याने श्वसनाचे आजार कमी होतात. तसेच दिवसभरातून किमान १० ग्लास तरी पाणी पिणे. पाणी तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. श्वसनाचे विकार दूर राहण्यासाठी गुळाचे आवर्जून सेवन करा.

श्वसनाचे आजार कमी करण्यासाठी तुम्ही तेलकट पदार्थ पासून लांब राहिले पाहिजे. त्यामुळे देखील श्वसनाचे आजार उद्भवतात. कारण आपण दिवाळीत फराळ बनावट असतो. त्या तेलाच्या वासनांनी आपल्याला जास्त प्रमाणात त्रास होतो. त्यासाठी तेलापासून पासून लांब राहणे.

हे ही वाचा : 

दिवाळीत सोने खरेदी करताय ? तर घ्या अशी काळजी…

 

Exit mobile version