spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2023, गॅस ही न पेटवता करा झटपट इंस्टंस्ट Kaju Katali Modak

गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण सर्व आतुरतेने वाट बघत आहेत. गणपती बाप्पाच्या स्वागताला आपण गोडाचे विविध पदार्थ बनवतो. त्यातील बाप्पाला प्रिय पदार्थ म्हणजे मोदक आहे.

गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण सर्व आतुरतेने वाट बघत आहेत. गणपती बाप्पाच्या स्वागताला आपण गोडाचे विविध पदार्थ बनवतो. त्यातील बाप्पाला प्रिय पदार्थ म्हणजे मोदक आहे. मोदक शिवाय गणपती बाप्पाच्या नैवेद्याची थाळी पुर्ण होऊच शकत नाही. गणेश चतुर्थीला १० दिवस वेगवेगळे प्रकारचे मोदक आपण बाप्पाला अर्पण करतो. आपण आतापर्यंत उकडीचे किंवा तळणीचे मोदक हे खाल्लेच असतील. परंतु बदलत्या काळानुसार या मोदकांमध्ये नावीन्य आलेले आपल्याला पहायला मिळते.

आपण कोणत्याही पद्धतीने मोदक बनवायचे म्हटले तर, खूप मोठा घाट घालावा लागतो. सुरुवातीला मोदकाचे पीठ भिजवा, उकड काढा आणि सारण तयार करा अशी ती तारेवरची कसरत करावी लागते. पण अगदी कमी साहित्यात व गॅसचा वापर न करता झटपट मोदक आपल्याला बनवता येऊ शकतात, असे सांगितल्यास कुणाचा ही यावर विश्वास बसणार नाही.यंदा गणेशोत्सावाला आपण घरी इंस्टंस्ट काजू कतली मोदक झटपट बनवू शकतो. हे मोदक बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची उकड किंवा सारण बनवण्याचा घाट ही घालावा लागत नाही. चला तर मग पाहूया इंस्टंस्ट काजू कतली मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य –
२ कप काजू
१ कप पिठीसाखर
अर्धा कप मिल्क पावडर
५ ते ६ टेबलस्पून पाणी
चांदीचा वर्ख

कृती –
सर्वप्रथम काजू हे एका मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची थोडी जाडसर भरड करून घ्यावी. ही मिक्सरमध्ये बारीक झालेली भरड एका छोट्या चाळणीतून चांगली चाळून घ्यावी. चाळून घेतलेल्या काजू पावडरमध्ये पिठीसाखर आणि मिल्क पावडर घाला. त्यानंतर त्यात ५ ते ६ टेबलस्पून पाणी घालून घ्यावे. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्यानंतर हे तयार झालेले पीठ मोदकाच्या साच्यात भरुन त्याला मोदकाचा आकार द्यावा. मोदक तयार झाल्यानंतर मोदकांवर तुम्ही आपल्या आवडीनुसार चांदीचा वर्ख लावून सजवू शकता. तयार झालेले आहेत आपले इंस्टंस्ट काजू कतली मोदक.

हे ही वाचा:

Vegan food वेगन पदार्थ म्हणजे काय ? जाणून घ्या

तुम्ही हरतालिका व्रत पहिल्यांदा करत असाल तर ‘या’ गोष्टी घ्या जाणुन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss