spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गौतमी पाटीलच नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव सगळीकडे चर्चेत आहे. "सबसे कातिल गौतमी पाटील"अश्या नावाने तिला ओळखलं जात.

सध्या गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव सगळीकडे चर्चेत आहे. “सबसे कातिल गौतमी पाटील”अश्या नावाने तिला ओळखलं जात. आपल्या नृत्याने सगळ्यांना वेड लावणाऱ्या गौतमीच नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘माझा कारभार सोपा नसतोय रं’ असे या नवीन गाण्याचं नाव आहे. तिच्या नवीन गाण्यामध्ये तिचा नखरेल लुक सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. गौतमीच हे नवीन गाणं सोशल मीडियावर खूप व्हारल होत आहे. तिच्या नखरेल अदा, बोल्ड लुकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. या गाण्यामध्ये तिने शॉर्ट स्कर्ट, चोळी, केसात गजरा, कपाळावर टिकली असा लुक केला आहे. तिच्या या नवीन गाण्यात तिच्या हातामध्ये दारूच्या बॉटलसुद्धा आहेत. गौतमीने तिच्या नखरेल अदानी सगळ्यांना वेड लावले आहे.

‘माझा कारभार सोपा नसतोय रं’ हे गौतमी पाटीलच नवीन गाणं युट्युबवर प्रदर्शित झाले आहे. तीच हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्याला ५३ हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तिच्या नवीन गाण्यावर नेटकाऱ्यानी कंमेंट देखील केल्या आहेत. गौतमीचा कारभार सोपा नसतोय रं”,जबरदस्त गाणं , खूप छान, लय भारी अश्या कंमेंट केल्या आहेत. गौतमीच हे गाणं चाहात्यांना आवडले असून ते छान छान कंमेंट करत आहेत. गौतमीने नवीन गाण्याचा विडिओ शेअर करत सगळ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आणि ती म्हणाली ‘ माझा कारभार सोप्पा नसतोय रं”, असं या गाण्याचं नाव आहे. रेक्स स्टुडिओच्या युट्यूब चॅनलवर हे गाणं प्रेक्षक पाहू शकतात. रत्नदिप कांबळे यांनी निर्मिती केली आहे. सर्वांनी आवर्जून हे गाणं पाहावं. या गाण्यात माझा नवा अंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहे. सर्व प्रेक्षकांनी आणि महिलावर्गाने हे गाणं आवर्जुन पाहा. माझ्यावरचं तुमचं प्रेम असचं कायम राहुद्या. माझ्या गाण्यावरदेखील प्रेम करा..धन्यवाद”.

गौतमी पाटीलने गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे तेव्हा ती म्हणाली ‘जेवढी साधी भोळी त्याच्या दुप्पट तिखट आहे. सादर करीत आहोत सबसे कातील गौतमी पाटील यांचा अनोखा अंदाज…’माझा कारभार सोपा नसतोय रं’. ती कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या कातिल अदां आणि अंगप्रदर्शन याच्यामुळे तिला नेहमी ट्रोल केले जाते. गौतमी पाटीलचा ‘घुंगरू’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Latest Posts

Don't Miss