spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Heavy Rainfall : Department of Meteorology चा अंदाज पुन्हा चुकला ; पूरग्रस्त परिसरात पूर ओसरला

गुरुवार पासून राज्यात पावसाने सर्वांचे तोंडचे पाणी पळवले होते. विशेषतः विद्येचे महेरघर असलेल्या पुण्याची अवस्था ही जवजवळ नदीत रूपांतरित झाली होती. त्यामुळे विद्येचं महेरघर हे पाण्याचे माहेरघर झाले होते. तेथील रस्त्ये हे नदी-नाले झाले होते. विशाळगड परिसरात तर ६ ते ७ फूट पाणी वाढले होते. अनेक जण या पूरपरिस्थिती अडकून पडले होते. राज्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यानंतर शुक्रवारी हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे आठ जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालये शुक्रवारी बंद राहणार आहे. त्यात ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचा समावेश आहे.

या पुरग्रस्त परिस्थती आता पूर्व पदावर आली आहे. पुणे जिल्ह्यात पावसामुळे लष्कर आणि एनडीआरएफच्या टीमला बोलवावे लागले होते. आता शुक्रवारी सकाळी परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. पावसाने विश्रांती घेतली असून अनेक भागांतील पाणी ओसरले आहे. पुण्यात गुरुवारी एकाच दिवसात ७ जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईत शुक्रवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईतील शाळा, महाविद्यालये आज सुरु राहणार आहे. परंतु पुण्यासह आठ ठिकाणी सुट्टी असणार आहे.

ते आठ जिल्हे कोणते ?

एकंदरीत गुरुवारची पूरग्रस्त परिस्थिती पाहून शासनाने काही जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये बंद राहण्याचे आदेश देण्यात आले होते त्याचप्रमाणे शुक्रवारी हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे आठ जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालये शुक्रवारी बंदच राहणार आहेत. त्यात ठाणे (Thane), नवी मुंबई (New mumbai), पुणे (Pune), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratanagiri), पालघर(Palghar), कोल्हापूर(Kolhapur), सांगली (sangali) जिल्ह्याचा समावेश आहे. पुण्यातील डेक्कन परिसरात पुलाची वाडी येथे शॉक लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. कात्रज तलावात बुडून दोघांचा तर तामिनी घाटात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

तसेच इंद्रायणी नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील माती गणपतीजवळ वडापाव विकणारा तरुण पाण्यात पोहण्यासाठी गेला असता वाहून गेला. दिनेश असे या तरुणाचे नाव असून आज नदीला पूर आल्यानंतर दिनेश हा अष्टभुजा मंदिर परिसरात पोहण्यासाठी पाण्यात शिरला आणि वाहून गेला. दिनेशचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकांकडून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू आहे. आज पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट मुंबई हवामान विभागाने दिला आहे. तसेच नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, सातारा जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा कमी करण्यात आला आहे. खडकवासला धरणातून आता केवळ १३००० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. ३१ हजार क्यूसेकवरून पाण्याचा विसर्ग कमी करत तो केवळ १३ हजार क्युसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला.

 “लाडका भाऊ आणि बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष व्यवस्थित चालले असते.” पदाधिकारी मेळाव्यात Raj Thackeray यांनी लागावला टोला

Heavy Rainfal : मुख्यमंत्र्यांनी पूरजन्य परिस्थितीचा घेतला आढावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss