विद्यापीठांना मराठी पुस्तक उपलब्ध करून देणे बंधनकारक

मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी आता सगळीकडे सक्ती करण्यात आली आहे. यासाठी आता महाराष्ट्र सरकारने आग्रही भूमिका घेतली आहे.

विद्यापीठांना मराठी पुस्तक उपलब्ध करून देणे बंधनकारक

मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी आता सगळीकडे सक्ती करण्यात आली आहे. यासाठी आता महाराष्ट्र सरकारने आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे नव्या शिक्षण धोरणानुसार सर्व पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यासाठीचा निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने (Education Department) निर्णय घेतला. सर्व विज्ञान (Science) आणि वाणिज्य (Commerce) शाखेतील पुस्तक मराठीत उपलब्ध होणार आहेत. यासाठी सप्टेंबर शेवट्पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत देऊनसुद्धा काही विद्यापीठातील पुस्तके अजून मराठीमध्ये उपलब्ध झाली नाही आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत विद्यापीठांना ट्रान्सलेट (Translate) केलेली पुस्तक विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे. शिक्षण घेताना काहीवेळा विद्यर्थ्यांना इंग्रजी अभ्यासक्रम शिकण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मुलांना अभ्यास करताना अडथळा निर्माण होतो.

विदयार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मातृभाषेतील पुस्तकामुळे मुलांना अभ्यास करण सोपे होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजण्यास मदत होईल. इंग्लिशमधून ट्रान्सलेट केलेली ही पुस्तक विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर ठरणार आहेत.
मुंबईच्या आयआयटीकडून विद्यापीठांना मराठी भाषेत ट्रान्सेट केलेली पुस्तक मिळणार आहेत. यासाठी मुंबई विद्यपीठाने आयआयटी कडून करार केला आहे. यामुळे पुस्तक ट्रान्सलेट करण्याच्या कामाला वेग आला आहे. अर्ध शैक्षणिक वर्ष पूर्ण होत आलं तरी विद्यार्थ्यांना ट्रान्सलेट केलेली पुस्तक मिळाली नाही आहेत. त्यामुळे ही पुस्तकं लवकरात लवकर विद्यापीठांना उपलब्ध करुन द्यावी लागणार आहेत. दोन आठवड्यामध्ये विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील कमीत कमी १० पुस्तक तरी त्याना भाषणांतरीत करावी लागणार आहेत.

या संदर्भात उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी विद्यापीठांना आदेश दिले आहेत. सध्या राज्यात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना मराठी पुस्तक उपलब्ध करून द्यावे असे आदेश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा: 

Exit mobile version