spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Asaram Bapu वर माधवबाग येथे वैद्यकीय उपचार, खोपोलीत पोलिसांचा कडक बंदोबस्त…

जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात हृदयविकाराच्या उपचारासाठी आणण्यात आले आहे.

आसाराम बापू (Asaram Bapu) ला सप्टेंबर २०१३ मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. संताचं नाव धारण करून हैवान बनण्याचं कृत्य पांढरी दाढी आणि कपड्यांच्या आड असणारा आसाराम बापू करत होता. आता याच नराधमाला ७ दिवसांच्या पॅरोलवर मुंबईत आणलं आहे. जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात हृदयविकाराच्या उपचारासाठी आणण्यात आले आहे.

जोधपूर मध्यवर्ती कारागृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला हृदयाशी संबंधित आजारावर उपचारासाठी रायगड जिल्ह्यातील खोपोली (Khopoli) येथील माधवबाग (Madhavbagh) येथे वैद्यकीय केंद्रात आणण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. १३ ऑगस्ट रोजी राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत असताना महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आसाराम बापू पुढील सात दिवस उपचारासाठी या वैद्यकीय सुविधेत राहणार आहेत. रायगड पोलिसांनी तेथे पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. पॅरोल मंजूर करताना हायकोर्टाने काही अटी  घातल्या होत्या. ज्यात त्याच्यासोबत चार पोलीस कर्मचारी प्रवास करतील, त्याला सोबत दोन अटेंडंट ठेवण्याची मुभाही देण्यात आली होती. त्याला खोपोलीतील एका खाजगी कॉटेजमध्ये ठेवण्यात आले असून उपचार व वाहतुकीचा तसेच पोलीस बंदोबस्ताचा संपूर्ण खर्च त्यालाच करावा लागणार आहे.

आसाराम बापूला जोधपूर पोलिसांनी मंगळवारी कारागृहातून विमानतळावर नेण्यासाठी सुरक्षा व्यवस्था केली. त्याचा पॅरोलचा कालावधी हा हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यापासून मोजला जाईल. डीसीपी आलोक श्रीवास्तव यांनी सांगितले की, जोधपूर पोलिसांचे उपनिरीक्षक भंवर सिंह यांच्या नेतृत्वाखाली ४ पोलीस त्याच्यासोबत असतील. आसारामने यापूर्वीही अनेकवेळा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र प्रथमच १३ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी आणि न्यायमूर्ती मुन्नार लक्ष्मण यांच्या खंडपीठाने जोधपूर एम्सच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे सात दिवसांचा हा पॅरोल दिला आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री शिंदे यांनी दीपक केसरकरांना फटकारलं, कारवाईची घोषणा नको, कृती करा…

National Sports Day 2024: राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यामागचे कारण माहीत आहे का?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss