spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MIM कडून ‘मिशन महापालिका’च्या अनुषंगाने हालचाली सुरू, ते तीन पक्ष कोणते खुलासा होणार का??

आगामी निवडणुका बघता महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. तसेच आता एमआयएमकडून (MIM) 'मिशन महापालिका'च्या अनुषंगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. तीन पक्षांसोबत युती करण्याचा एमआयएमचा विचार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

आगामी निवडणुका बघता महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. तसेच आता एमआयएमकडून (MIM) ‘मिशन महापालिका’च्या अनुषंगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. तीन पक्षांसोबत युती करण्याचा एमआयएमचा विचार आहे, अशी माहिती मिळाली आहे. असदोद्दीन ओवेसी हे एमआयएमचे राष्ट्रिय अध्यक्ष आहेत (Asaduddin Owaisi), यांच्या उपस्थितीत मुंबईत होत असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात यासंदर्भात ठराव मांडण्यात आला. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी वेगाने घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत आज व उद्या असे दोन दिवस एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनासाठी देशभरातील खासदार, आमदार तसेच एमआयएम पक्षाचे नगरसेवक उपस्थित असणार आहेत. आज झालेल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काही महत्वाच्या ठरवांची मांडणी करण्यात आली, यामध्ये येत्या महानगरपालिका निवडणुकीचा विचार करुन राज्यातील तीन पक्षांसोबत युतीची चर्चा सुरु असल्याची महिती देण्यात आली आहे. मात्र यावेळी पक्षांची नावं उघड करण्यात आली नाही. सद्या हि चर्चा प्राथमिक स्तरावर सुरू आहे, त्यामुळे आता ते तीन पक्ष कोणते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन पार्टी सोबत आघाडीवर असणाऱ्या एमआयएम पक्षाला यश मिळाले होते. तेव्हा महाराष्ट्रातील पहिला खासदार म्हणून इम्तियाज जलील निवडून आले होते. त्यावेळेस या दोन्ही पक्षांनी घेतेलेल्या मतदानाचा मोठा फटका राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला बसला होता. सद्या वंचितबहुजन पार्टी उद्धव ठाकरेंच्या (UddhavThackeray) सोबत गेल्याने एमआयएम एकटा पडला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता एमआयएम पक्षाकडून नवीन मित्रांची चाचपणी करण्यात येणार आहे. परंतु ते पक्ष कोणते हे गुपित अजुन उघडकीस आले नाही.

हे ही वाचा :

एकनाथ शिंदे जे बोलतो तेच करून दाखवतो, एकनाथ शिंदे कसबा निवडणुकीच्या प्रचारामध्ये म्हणाले

भारतामधील प्रसिद्ध दिगर्शक संजय लीला भन्साळी यांचे काही हिट चित्रपट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss